SIM Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत सुरु, 60 सेंकदात पडेल माहिती

SIM Card | गेल्या काही वर्षांत सिम कार्डद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात जागरुक आणि सतर्क असणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर जर इतर कोणी सिम कार्ड खरेदी करुन त्याचा वापर करत असेल तर त्याचा पण पत्ता लागतो. त्यासाठी ही एक ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.

SIM Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत सुरु, 60 सेंकदात पडेल माहिती
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 11:45 AM

नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : स्मार्टफोन आणि इंटरनेट आता गरज झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात दिवसागणिक ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात वाढ होत आहे. सहज काही लिंक्स , एसएमएसवरुन सहज कोणाला पण गंडा घालण्यात येत आहे. कधी कधी अशा फसवणूक प्रकरणात कोणाच्या पण नावे सिम कार्ड तयार करण्यात येते, त्याआधारे इतर कोणाला गंडा घालण्यात येतो. त्यामुळे आपल्या नावाचे तर सिम कार्ड वापरुन इतर कोणाची फसवणूक करण्यात येत नाही ना? यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. तुमच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

काही सेंकदात माहिती

पूर्वी कोणत्या व्यक्तीच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती हाती येणे अवघड होते. पण आता एका व्यक्तीच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, याची माहिती सहज मिळवता येते. आता केवळ 60 सेकंदात म्हणजे एका मिनिटात तुम्हाला माहिती होईल की तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत. कोणी इतर तर तुमच्या सिमकार्डचा वापर करत नाही ना, याची माहिती सहज मिळवता येते.

हे सुद्धा वाचा

संचार सारथीची मदत

जर एखादा सायबर गुन्हेगार दुसऱ्याच व्यक्तीचा वापर करुन फसवणूक करत असेल तर अशा प्रकरणात थांगपत्ता लावण्यासाठी केंद्र सरकारने संचार सारथी पोर्टलची सुरुवात केली आहे. त्याच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही सेकंदात तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत. त्याचा वापर होत आहे, याची माहिती मिळते. तुम्ही या पोर्टलच्या मदतीने तुमच्या नावावर सुरु असलेल्या पण तुम्ही वापरत नसलेले सिमकार्ड सुद्धा बंद करु शकता.

अशी आहे प्रक्रिया

  • सर्वात अगोदर tafcop.sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जा
  • नवीन पेज उघडा, त्याठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाका
  • आता पेजवर कॅप्चा कोड नोंदवा
  • तुमच्या क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल. तो भरा
  • या पोर्टलवर तुमचे लॉगिन झाले असेल
  • तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरु आहेत याची माहिती आली असेल
  • यामध्ये तुमच्या नावावर वेगळाच मोबाईल क्रमांक दिसत असेल तर तो बंद करता येतो
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.