नवीन फोटो एडिटिंग टूल्स, पेमेंट शॉर्टकटसह WhatsApp मध्ये मिळणार 6 धमाकेदार फीचर्स
आजच्या युगात आपण सर्व सोशल मीडियाशी जोडलेले आहोत पण त्या सर्व अॅप्सपैकी आपण व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर करतो यात शंका नाही. व्हॉट्सअॅप हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
नवी दिल्ली : जर तुम्हाला मित्राशी बोलायचे असेल, तुम्हाला दुसऱ्या शहरात बसलेल्या आईचा चेहरा पाहायचा असेल, ऑफिसचे काम करायचे असेल किंवा अगदी यूपीआय आधारीत पेमेंट करायचं असलं तरी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. आजच्या युगात आपण सर्व सोशल मीडियाशी जोडलेले आहोत पण त्या सर्व अॅप्सपैकी आपण व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर करतो यात शंका नाही. व्हॉट्सअॅप हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. (Six new WhatsApp features coming soon; know how they will work)
व्हॉट्सअॅपची मालकी असलेली कंपनी फेसबुक गेल्या काही काळापासून अॅपमध्ये बरेच बदल करत आहे. कंपनी आता त्यांच्या अॅपमध्ये लवकरच 6 नवे फीचर्स रोलआऊट करणार आहे. ज्यामुळे हे अॅप वापरण्याचा तुमचा एक्सपीरियन्स अधिक चांगला होईल. चला तर मग जाणून घेऊयात कंपनीच्या नवीन फीचर्स अपडेटबद्दल…
चॅट बबलच्या डिझाइनमध्ये बदल
अनेक मीडियामधील दाव्यांनुसार व्हॉट्सअॅप आपल्या चॅट बबल्सचे डिझाईन बदलत आहे. आता व्हॉट्सअॅपवर चॅट बबलचा आकार थोडा मोठा, गोल आणि हिरव्या रंगात पाहायला मिळेल.
कॉन्टॅक्ट्स कार्ड वेगळं दिसेल
नवीन अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये जे कॉन्टॅक्ट्सच्या माहितीसाठी वापरले जाणारे इन्फो बटण आता कॉन्टॅक्ट नावाच्या बाजूला शिफ्ट होईल. तसेच प्रोफाईल फोटो आता स्क्वेअर बॉक्समध्ये दिसणार नाही.
मेसेज रिअॅक्शन्स
इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे, युजर्स आता व्हॉट्सअॅपवर मेसेज प्रेस करुन इमोजीसह रिअॅक्शन देऊ शकतील. जर तुमचं किंवा तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्या व्यक्तिचं अॅप अपडेट नसेल तर व्हॉट्सअॅप अपडेटची सूचना देईल. कारण जर तुम्हाला मेसेज रिअॅक्शन फीचर युज करायचं अथवा पाहायचं असेल तर तुम्हाला अॅप अपडेट करावं लागेल.
नवीन फोटो एडिटिंग टूल्स
‘ड्रॉइंग टूल्स’ नावाचे नवीन अपडेट दिसेल जे फोटो एडिट करण्यात मदत करेल. आपण या एडिटेड फोटोंवर स्टिकर्सदेखील जोडू शकता.
नवीन पेमेंट शॉर्टकट
अँड्रॉइड युझर्सना व्हॉट्सअॅपच्या पेमेंट ऑप्शनचा (Payment Option) शॉर्टकट आता चॅट बारमध्येही (Chat Bar) दिसेल. अर्थात सध्याचा पेमेंट ऑप्शन न बदलता हे अतिरिक्त फिचर देण्यात येणार आहे.
व्हॉइस मेसेजला नवीन इंटरफेस
व्हॉइस मेसेजला (Voice Message) नवीन इंटरफेस (New Interface) देण्यात आलं असून, आता युझर्स व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी तो ऐकू शकतील आणि नको असल्यास तो डिलीट करु शकतील.
इतर बातम्या
रे-बॅनच्या सहकार्याने फेसबुक स्मार्ट ग्लासेस करणार लाँच, जाणून घ्या काय असेल खासियत
त्वरा करा! आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी, आयफोन 12 वर हजारो रुपयांची सूट, काही तासांसाठीच आहे ऑफर
अवघ्या 6,999 रुपयात दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात
(Six new WhatsApp features coming soon; know how they will work)