AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे स्मार्टफोन कंपन्या तोट्यात, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होणार

कोव्हिड-19 ची दुसरी लाट आणि विविध राज्यांमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये घसरण होऊ शकते.

लॉकडाऊनमुळे स्मार्टफोन कंपन्या तोट्यात, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होणार
Smartphone Sale
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 8:42 PM

मुंबई : कोव्हिड-19 ची दुसरी लाट आणि विविध राज्यांमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये 2021 च्या दुसर्‍या तिमाहीत (एप्रिल ते जून या कालावधीत) 15 ते 20 टक्क्यांची घसरण दिसून येऊ शकते. सोमवारी एका नव्या अहवालात याबाबतचा दावा करण्यात आला आहे. मार्केट इंटेलिजेंस कंपनी सीएमआरच्या म्हणण्यानुसार, पुरवठा साखळीतील (सप्लाय चेन) विघटन आणि घटकांच्या (कंपोनंट) अभावामुळे स्मार्टफोन ब्रँड्सवर परिणाम होईल. (Smartphone market can go down due to lockdown; Covid-19 effect)

सीएमआरच्या वतीने आनंद प्रिया सिंह म्हणाले की, सध्याची बाजारपेठ चांगली आहे, स्मार्टफोन उद्योगाच्या संभाव्यतेबाबत आम्ही आशावादी आहोत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च कालावधी), सॅमसंगने भारतातील संपूर्ण मोबाइल मार्केटमध्ये 18 टक्के बाजारासह आघाडी घेतली आहे, तर शाओमी 28 टक्के मार्केट शेअरसह देशातील स्मार्टफोन विभागात वर्चस्व गाजवत आहे.

सीएमआरच्या इंडिया मोबाइल हँडसेट बाजाराच्या रिव्ह्यू अहवालानुसार मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत भारतातील एकूण स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात 4 जी स्मार्टफोन्सना जोरदार मागणी आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत 4 जी स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला शाओमीचा स्वतंत्र ब्रँड पोकोने 465 टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे, तर वनप्लस आणि आयटेल स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्येही तिहेरी आकड्यांची वाढ झाली आहे. म्हणजे वार्षिक आधारावर 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

शिपमेंटमध्ये शाओमी अव्वल

सीएमआरच्या वतीने शिप्रा सिन्हा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाओमी कंपनी स्मार्टफोन शिपमेंटमध्ये अव्वल आहे, आणि शाओमीसाठी पोकोची उल्लेखनीय वाढ सुरुच आहे. त्यास सॅमसंग आणि व्हिवो कडून जोरदार स्पर्धा मिळत आहे. पहिल्या तिमाहीत ओप्पोने नवीन 5 जी सक्षम स्मार्टफोनसह विकासाची गती सुरू ठेवली आहे.

फीचर फोन विभागातही सॅमसंगचा जलवा

सॅमसंगने 41 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या कालावधीत सॅमसंग ए 12, ए 32, ए 52 आणि ए 72 सह कमीतकमी 12 नवीन मॉडेल्सदेखील बाजारात सादर केले आहेत. सॅमसंगच्या एकूण शिपमेंटमध्ये त्यांचा 25 टक्के हिस्सा आहे. बाजारात 20 टक्के हिस्सा असलेल्या फीचर फोन विभागात सॅमसंग दुसर्‍या क्रमांकावर आहे.

5 जी स्मार्टफोन सेगमेंटमध्ये वनप्लस अव्वल

ओप्पोच्या शिपमेंटमध्ये वर्षाकाठी 16 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, वनप्लसने बाजारातील 33 टक्के हिस्सेदारीसह 5 जी स्मार्टफोन सेगमेंटचं नेतृत्व केलं आहे. त्यानंतर 14 टक्के बाजार हिस्सेदारीसह रियलमीचा नंबर लागतो. 2021 च्या पहिल्या तिमाहीत 5 जी स्मार्टफोन शिपमेंटच्या एकूण स्मार्टफोन शिपमेंटपैकी 7 टक्के हिस्सा रियलमीचा होता. व्हिवोने बाजारातील 16 टक्के हिस्सा काबीज केला आहे. त्यांच्या शिपमेंटमध्ये 20 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

इतर बातम्या

नवीन स्मार्टफोन दीर्घकाळ टिकवायचा आहे? मग या टिप्स नक्की वाचा

4GB/128GB, ट्रिपल कॅमेरा, 7400 हून कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच

(Smartphone market can go down due to lockdown; Covid-19 effect)

LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....