Sony New TV : कारपेक्षा महाग सोनीचा नवा टीव्ही, घरी बसून घ्या चित्रपटगृहाचा आनंद, अधिक जाणून घ्या…

Sony New TV : सोनीने भारतात पहिला अल्ट्रा एचडी मिनी एलईडी टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही 85 इंच आकाराचा येतो. त्याची किंमत प्रीमियम हॅचबॅक कार इतकी आहे. वाचा...

Sony New TV : कारपेक्षा महाग सोनीचा नवा टीव्ही, घरी बसून घ्या चित्रपटगृहाचा आनंद, अधिक जाणून घ्या...
Sony New TVImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 6:02 AM

नवी दिल्ली : सोनी (Sony) आपल्या अल्ट्रा-HD TV च्या श्रेणीचा विस्तार करत आहे. Sony XR-85X95K Ultra-HD Mini LED TV भारतात लाँच केला आहे. भारतात लाँच होणारी ही कंपनीची पहिली मिनी एलईडी (LED) टीव्ही (TV) मालिका आहे. टीव्हीची किंमत ऐकून तुम्हालसा आश्चर्य वाटेल. हा टीव्ही ज्या किंमतीसह लाँच करण्यात आला आहे. ती प्रीमियम हॅचबॅक कार असू शकते. कंपनीने 85-इंच डिस्प्ले साइज असलेल्या या टीव्हीची किंमत 8 लाख 99 हजार 900 रुपये ठेवली आहे. परंतु ऑफर अंतर्गत तुम्ही 6 लाख 99 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सोनी सेंटर स्टोअर्स व्यतिरिक्त आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवर टीव्हीची विक्री सुरू झाली आहे. या TVविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या. याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल.

Sony New TVचे हायलाईट्स

  1. टीव्हीची किंमत ऐकून तुम्हालसा आश्चर्य वाटेल.
  2. कंपनीने 85-इंच डिस्प्ले साइज असलेल्या या टीव्हीची किंमत 8 लाख 99 हजार 900 रुपये ठेवली आहे.
  3. 6 लाख 99 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
  4. इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवर टीव्हीची विक्री सुरू
  5. HDR10 पर्यंत डायनॅमिक कंटेंट रेंज आणि डॉल्बी व्हिजन
  6. टीव्हीमध्ये कंपनी 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 85-इंचाचा अल्ट्रा एचडी मिनी एलईडी डिस्प्ले
  7. हा टीव्ही Android TV सॉफ्टवेअरवर काम करतो.
  8. टीव्हीमध्ये सध्याच्या पिढीतील गेमिंग कन्सोलसाठी HDMI 2.1 देखील आहे
  9. नवीन सोनी टीव्हीमध्ये 6-स्पीकर ध्वनिक मल्टी-ऑडिओ सेटअप

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टीव्हीमध्ये कंपनी 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 85-इंचाचा अल्ट्रा एचडी मिनी एलईडी डिस्प्ले देत आहे. उत्कृष्ट चित्र गुणवत्तेसाठी त्यास कॉग्निटिव्ह प्रोसेसर XR सह XR बॅकलाईट मास्टर ड्राइव्ह तंत्रज्ञान देण्यात आले आहे. याशिवाय कंपनी HDR10 पर्यंत डायनॅमिक कंटेंट रेंज आणि डॉल्बी व्हिजन देखील देत आहे.

घरात चित्रपटगृहाचा आनंद

मजबूत आवाजासाठी या नवीन सोनी टीव्हीमध्ये 6-स्पीकर ध्वनिक मल्टी-ऑडिओ सेटअप आहे. हे 60W साउंड आउटपुटसह येते. याशिवाय टीव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉस देखील आहे. ज्यामुळे घरामध्ये सिनेमा हॉलसारखा अनुभव येतो. व्हॉईस कंट्रोलसाठी तुम्हाला टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट देखील मिळेल.

हेही वाचा….

Chromecast, Apple AirPlay आणि Apple HomeKit ने सुसज्ज असलेला हा टीव्ही Android TV सॉफ्टवेअरवर काम करतो. यामध्ये तुम्हाला गुगल टीव्हीचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल. टीव्हीमध्ये सध्याच्या पिढीतील गेमिंग कन्सोलसाठी HDMI 2.1 देखील आहे. हे 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश दरासह सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी टीव्हीला अनुकूल करते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.