1 इंचांच्या कॅमेरा सेन्सरसह Sony Xperia Pro-I स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

हल्ली प्रत्येक स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप दिला जातो. त्यामुळे लोकांमध्ये आता मोबाईल फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आहे. अशा लोकांसाठी, सोनीने एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे.

1 इंचांच्या कॅमेरा सेन्सरसह Sony Xperia Pro-I स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Sony Xperia Pro I
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 5:26 PM

मुंबई : हल्ली प्रत्येक स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप दिला जातो. त्यामुळे लोकांमध्ये आता मोबाईल फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आहे. अशा लोकांसाठी, सोनीने एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे, सोनीच्या नवीन फ्लॅगशिप फोनमध्ये फेस डिटेक्शन ऑटोफोकससह 1 इंचाचा Exmor RS सेन्सर आहे. सोनीने असेच तंत्रज्ञान मिररलेस अल्फा कॅमेऱ्यात दिले आहे, जो मिररलेस डीएसएलआर कॅमेरा आहे. (Sony Xperia Pro-I launched With 1-Inch Exmor RS CMOS Sensor, check Price, Specifications)

Sony Xperia Pro-I बद्दल कंपनीने सांगितले आहे की, हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो 1.0 टाईप सेन्सर फेस डिटेक्शनसह येतो. कंपनीचा दावा आहे की, हा कॅमेरा कमी प्रकाशात उत्तम फोटो क्लिक करू शकतो. हा 1 इंचाचा सेन्सर RX100 VII कॅमेऱ्याने प्रेरित आहे. हा RAW 12 बिट कॅमेरा शूटिंगला सपोर्ट करतो. यामध्ये युजर्सना हाय पिक्चर क्वालिटी मिळते. यामध्ये युजर्सना ड्युअल अपर्चर मिळते, ज्याची रेंज 2.0 ते f/4.0 पर्यंत असते. हा डेप्थ ऑफ फील्ड कन्व्हर्ट करु शकतो.

Sony Xperia Pro-I चे स्पेसिफिकेशन्स

हा Sony Xperia फोन 6.5 इंचाच्या 4K HDR OLED डिस्प्लेसह येतो आणि त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि मॅक्सिमम 12 जीबी रॅम आहे.

या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा 1 इंचांचा Exmor RS सेंसर आहे. तसेच 12 मेगापिक्सेल 1/2.9 इंच Exmor RS सेन्सर f/2.4 अपर्चर लेन्ससह, जी सेकेंडरी लेन्स आहे. तिसरा कॅमेरा देखील 12 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 8 मेगापिक्सेल 1/4-इंच सेन्सर आहे.

हा फोन सिनेमॅटोग्राफी प्रो मोडसह येतो जो युजर्सना उत्कृष्ट व्हिडिओ आणि फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या सेटिंग्ज अॅडजस्ट करण्यास अनुमती देतो. सोनीचा व्लॉग मॉनिटर सेकेंडरी डिस्प्ले म्हणून काम करतो जो Xperia Pro-i च्या मागील बाजूस जोडतो, ज्यामुळे ही डिव्हाईस अधिक उपयुक्त बनते.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(Sony Xperia Pro-I launched With 1-Inch Exmor RS CMOS Sensor, check Price, Specifications)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.