Nothing Phone (1) : नथिंग फोनच्या (1) लॉंचच्या पहिलेच समोर आले ‘स्पेसिफिकेशन्स ‘ आणि ‘कॅमेरा सेटअप’…

भारतात नथिंग फोन (1) लवकरच ग्राहकांच्या हाती येणार आहे. परंतु, लाँच करण्यापूर्वीच या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि कॅमेरा सेटअपची चर्चा सुरू झाली आहे.

Nothing Phone (1) : नथिंग फोनच्या (1) लॉंचच्या पहिलेच समोर आले ‘स्पेसिफिकेशन्स ‘ आणि ‘कॅमेरा सेटअप’…
नथिंग फोनImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 2:15 PM

मुंबई : भारतात नथिंग फोन (1) लाँच होण्यापूर्वीच या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये (Features of the smartphone) आणि कॅमेरा सेटअप समोर आले आहेत. नथिंग नावाचा या ब्रँडचा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने आधीच घोषीत केले आहे की ती या वर्षाच्या उन्हाळ्यात हा फोन मार्केटमध्ये विकेल. याआधी कंपनीने नथिंग ओएस लाँचर रिलीज केले आहे. एकेकाळी वनप्लसचे सह-संस्थापक असलेले कार्ल पेई (Carl Pei) यांनी आता नंथिंग सुरू केले आहे. नंथिंग तर्फे लवकरच बाजारपेठेत नवा फोन लॉंच होत आहे. परंतु, त्याची काही वैशिष्टये आधीच खुली झाल्याची चर्चा मोबाईल मार्केटमध्ये (In the mobile market) रंगली आहे. परंतु, प्रत्यक्षात एका ट्विटर यूजरने काही स्पेसिफिकेशन्स पोस्ट केले आहेत आणि नथिंगच्य येणाऱया फोनचे हे स्पेसिफिकेशन्स असल्याचे सांगितले आहेत. कंपनीने आधीच सांगितले आहे की ते या वर्षाच्या उन्हाळ्यात आपला फोन बाजारात आणतील. हा फोन केवळ फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर OnePlus फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

नथिंग फोन (1) चे संभाव्य तपशील

91 मोबाईल्सने अनव्हेरीफाईड ट्विटर युजर्सचा हवाला देऊन नथिंग फोन 1 चे संभाव्य तपशील दिले आहेत. ट्विटनुसार, या फोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. तर 90Hz चा रिफ्रेश दर आणि AMOLED डिस्प्ले उपलब्ध असेल. यात HDR 10 Plus चा सपोर्ट मिळेल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला जाईल.

नथिंग फोनचा संभाव्य कॅमेरा सेटअप

नथिंग फोन (1) च्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर, याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असेल, तर सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा असेल. यामध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिसू शकतो. मात्र, या फीचर्सची कंपनीने अद्याप पडताळणी केलेली नाही.

हे सुद्धा वाचा

वायरलेस चार्जिंग सपोर्ट

या फोनमध्ये 4500 mAh बॅटरी असेल, जी फास्ट वायर चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. वायरलेस चार्जिंगसाठी येत असताना, हा प्रीमियम कॅटेगरीचा स्मार्टफोन असेल अशी माहिती आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.