Jio Airfiber : जिओ एअरफायबरचा श्रीगणेशा! जाणून घ्या काय आहे ऑफर

Jio Airfiber : जिओ एअरफायबरने आज बाजारात सेवेचा श्रीगणेशा केला. सध्या देशातील आठ शहरांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. काय आहे ऑफर

Jio Airfiber : जिओ एअरफायबरचा श्रीगणेशा! जाणून घ्या काय आहे ऑफर
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 6:49 PM

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांच्या सेवेची सुरुवात केली. जिओ एअरफायबर (Jio Airfiber) लाँच केले. हे एक इंटिग्रेटेड एंड-टू-एंड सोल्यूशन आहे. ही सेवा होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस, हाय स्पीड ब्राँडबँड सेवा देईल. सध्या कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये ही सेवा सुरु केली आहे. जिओचा ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण देशात 15 लाख किमी पेक्षा अधिक भागात विस्तारलेले आहे. पण अद्याप देशातील अनेक घरापर्यंत, व्यावसायिक गाळ्यापर्यंत ही केबल लाईन पोहचवणे जिकरीचे काम आहे. जिओ एअरफायबरमुळे हा प्रवास आता सोपा झाला आहे. जिओ एअरफायबर देशातील 20 कोटी घरे आणि कार्यालयांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नात आहे. मुकेश अंबानी यांनी या 29 ऑगस्ट रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ एअरफायबरची घोषणा केली होती.

क्रांतीकारक पाऊल

ही सेवा इंटरनेट युगातील क्रांतीकारक पाऊल मानण्यात येत आहे. कंपनीने एअर फायबर आणि एअर फायबर मॅक्स ही दोन प्लॅन बाजारात उतरवली आहेत. हे फायबर प्लॅन ग्राहकांना दोन प्रकारची गतिमानता देईल. यामध्ये 30 एमबीपीएस आणि 100 एमबीपीएस स्पीड मिळेल. कंपनीच्या सुरुवातीच्या 30 एमबीपीएस साठी ग्राहकांना 599 रुपये मोजावे लागतील. तर 100 एमबीपीएस प्लॅनसाठी 899 रुपये खर्च येईल. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 550 हून अधिक डिजिटल चॅनल आणि 14 इंटरटेनमेंट ऐप मिळतील. कंपनीने एअर फायबर अंतर्गत 100 एमबीपीएस स्पीडचा एक 1199 रुपयांचा एक प्लॅन पण सादर केला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, एमेझॉन आणि जिओ सिनेमा यांचे प्रीमिअम एप्स मिळतील.

हे सुद्धा वाचा

हे आहेत महागडे प्लॅन

  1. ग्राहकांना अधिक इंटरनेट स्पीड हवी मिळेल, त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
  2. एअर फायबर मॅक्स प्लॅनपैकी ग्राहकाला एकाची निवड करता येईल.
  3. कंपनीने 300 एमबीपीएस ते 1000 एमबीपीएस म्हणजे 1 जीबीपीएस पर्यंत तीन प्लॅन आणले आहेत.
  4. 1,499 रुपयांमध्ये 300 एमबीपीएसचा स्पीड मिळेल.
  5. 2,499 रुपयांमध्ये 500 एमबीपीएसपर्यंतची स्पीड ग्राहकांना मिळेल.
  6. 3,999 रुपयांमध्ये ग्राहकांना 1 जीबीपीएस स्पीडचा प्लॅन मिळेल.
  7. सर्वच प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, एमेझॉन आणि जिओ सिनेमा प्रीमिअम एप्स मिळेल.

अशी मिळवा सेवा

जियो एअरफाइबर ऑनलाईन आणि ऑफलाईन बुक करता येईल. 60008-60008 वर मिस्ड कॉल देऊन अथवा www.jio.com वर बुकिंग प्रक्रिया पूर्ण करता येईल. जिओ स्टोअर्समधून जिओ एअरफाईबर खरेदी करता येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.