5 जीच्या दुनियेत टाटा ग्रुप क्रांती घडवणार, मुकेश अंबानींना देणार टक्कर
टाटा सन्स आणि तेजस नेटवर्क करारासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, टाटा सन्सचे एक युनिट पॅनाटोन फिनवेस्ट लिमिटेड(Panatone Finvest Ltd) तेजस नेटवर्कमधील 43.35 टक्के भाग खरेदी करेल.
मुंबई : टाटा ग्रुप 5 जीच्या जगात क्रांती घडविण्याची तयारी करत आहे. रिलायन्स जिओने आधीच 5G संदर्भात आपला मेगा प्लॅन जाहीर केला आहे. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा सन्स(Tata Sons)ने दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या तेजस नेटवर्क(Tejas Network)मधील नियंत्रक भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे टाटा समूहाची एंट्री 5G मध्ये होईल आणि ती नोकिया(Nokia), एरिक्सन(Ericsson) आणि हुआवेई(Huawei) सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल. मुकेश अंबानीचीही 5 जी संबंधित एक मोठी योजना आहे. (Tata Group to revolutionize 5G world, competition with Mukesh Ambani)
रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की जिओच्या मदतीने आपण भारत 2G फ्री आणि 5 जी सक्षम बनवू. त्यांनी आश्वासन दिले की, देशात फक्त रिलायन्स जिओ(Reliance Jio)च 5G सुरू करेल. रिलायन्स जिओने अत्याधुनिक स्टँडअलोन 5 जी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड प्रगती केली आहे, जे वायरलेस ब्रॉडबँडसाठी एक मोठी झेप आहे. मुकेश अंबानी म्हणाले की 5 जी चाचण्या दरम्यान जिओने 1 जीबीपीएसपेक्षा जास्त वेग यशस्वीपणे गाठला आहे. मुकेश अंबानी यांनी जिओच्या ‘मेड इन इंडिया’ सोल्यूशन जागतिक दर्जाचे असल्याचे म्हटले. जिओ दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये 5 जी तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. ते म्हणाले की जिओचा 5 जी भारतात यशस्वी होईल तेव्हा त्याची निर्यात जगातील इतर देशांमध्येही केली जाईल. अशा प्रकारे भारत 5G विकास आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनेल.
43.35 टक्के भागभांडवल खरेदी करेल
टाटा सन्स आणि तेजस नेटवर्क करारासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, टाटा सन्सचे एक युनिट पॅनाटोन फिनवेस्ट लिमिटेड(Panatone Finvest Ltd) तेजस नेटवर्कमधील 43.35 टक्के भाग खरेदी करेल. या कराराबाबत, तेजस नेटवर्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याने टाटा सन्सची (टाटा समूहाची होल्डिंग फर्म) उपकंपनी पँटोन फिनवेस्टसोबत बंधनकारक करार केला आहे. या कराराअंतर्गत, कंपनी पँटोनला प्राधान्य तत्त्वावर 258 रुपये प्रति शेअर दराने1.94 कोटी इक्विटी शेअर्स देईल, ज्याची एकूण किंमत 500 कोटी रुपये असेल.
प्राधान्य वाटपद्वारे खरेदी
कंपनीने सांगितले की, यानंतर आणखी 3.68 कोटी वॉरंटचे प्राधान्य वाटप होईल, त्यातील प्रत्येकी एका इक्विटी समभागात 258 रुपये दराने एक शेअर्समध्ये रूपांतरीत करता येईल, याची एकूण किंमत 950 कोटी रुपये असेल. हा पर्याय पॅंटोनद्वारे वॉरंट जारी केल्याच्या तारखेपासून 11 महिन्यांच्या आत एक किंवा अनेक टप्प्यांमध्ये वापरला जाऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, 1.55 कोटी वॉरंटचे प्राधान्य वाटप देखील केले जाईल, त्यापैकी प्रत्येकी 258 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दराने शेअर्समध्ये रूपांतरीत केले जाऊ शकते, ज्याची एकूण किंमत 400 कोटी रुपये असेल. वॉरंट जारी झाल्यापासून 18 महिन्यांच्या आत हा पर्याय वापरला जाऊ शकतो.
तेजस नेटवर्कमध्ये 72 टक्के टाटा सन्सचा हिस्सा
पॅंटोन विशिष्ट व्यवस्थापन कर्मचार्यांकडून तेजस नेटवर्कचे 13 लाख इक्विटी शेअर्स मिळवेल, ज्याचा दर 258 रुपये प्रति इक्विटी शेअरपेक्षा अधिक नसेल आणि याची एकूण रक्कम 34 कोटी रुपये आहे. त्यानंतर पॅनटोन आणि टाटा समूहाच्या काही कंपन्या सेबीच्या अधिग्रहणाच्या नियमांनुसार तेजस नेटवर्कच्या 4.03 कोटी इक्विटी शेअर्सच्या संपादनासाठी खुली ऑफर देतील. काही वर्षांत हा करार पूर्ण झाल्यावर तेजस नेटवर्कमधील टाटा सन्सची हिस्सेदारी 72 टक्क्यांपर्यंत वाढेल.
स्वदेशी 5 जी तंत्रज्ञानासाठी टीसीएस आणि एअरटेलची हातमिळवणी
5G च्या जगात क्रांती घडवण्यासाठी टाटा समूहाची तयारी सुरु आहे. सॉफ्टवेअर क्षमतेबद्दल बोलायचे तर हे काम TCS च्या मदतीने केले जाईल, तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात भारती एअरटेल आणि टाटा समूह कंपनी TCS यांनी संयुक्तपणे भारतातील 5G नेटवर्किंगसाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्या स्वदेशी 5G तंत्रज्ञानावर एकत्र काम करत आहेत. एअरटेल जानेवारी 2022 पर्यंत 5 जी साठी पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे.
PLI योजनेसाठी अर्ज
टाटा ग्रुप भारतात 5 जी ची पूर्ण तयारी करत आहे. एंटरप्राइझ विभागात स्वत: साठी असलेली संधी गमावू इच्छित नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, तेजस आणि टाटा सन्सकडून पीएलआय योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्याबाबत अर्जही दाखल करण्यात आले आहेत. तेजस स्थापनेचा उद्देश दूरसंचार कंपन्यांना उपकरणे पुरविणे हा होता. (Tata Group to revolutionize 5G world, competition with Mukesh Ambani)
मराठवाड्यातील एकमेव जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध, बीड जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची आता अँटिजन टेस्ट https://t.co/dVSPBjSSUB @dhananjay_munde @InfoBeed @BEEDPOLICE @OfficeofUT @rajeshtope11 #Beed #coronavirus #AntigenTest #DhananjayMunde #CheckPost
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
इतर बातम्या