नववर्षात TATA ची ‘ही’ कार लॉन्च होणार, मारुती सुझुकी डिझायरला टक्कर देणार?
Upcoming Cars in 2025: तुम्ही गाडी घेण्याचा प्लॅन करताय का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, नवी मारुती सुझुकी डिझायरची चमक कमी करण्यासाठी टाटा मोटर्सची नवी Tata Tigor पुढील वर्षात लॉन्च होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सच्या या कारच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कोणते बदल पाहायला मिळणार आहेत? याविषयी पुढे जाणून घेऊया.
Upcoming Cars in 2025: आता बाजारात एक नवी कार येत आहे. ही कार नवी मारुती सुझुकी डिझायरची चमक कमी करण्यासाठी येत आहे. टाटा मोटर्सची नवी Tata Tigor पुढील वर्षात लॉन्च होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक विस्ताराने पुढे जाणून घेऊया.
नवी कार भारतीय बाजारात लॉन्च
मारुती सुझुकीच्या पहिल्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग नव्या डिझायरने धुमाकूळ घातला असला तरी आता टाटा मोटर्सने डिझायरची चमक कमी करण्याची योजना आखल्याचे दिसत आहे. आता नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये टाटा मोटर्स लवकरच एक नवी कार भारतीय बाजारात लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही डिझायरला टक्कर देईल.
टाटा मोटर्सची लोकप्रिय कार Tata Tigor लवकरच धमाकेदार बाजारात दाखल होऊ शकते. रश्लेनच्या रिपोर्टनुसार, टाटाची कार जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन डिझाईन आणि फीचर्ससह लॉन्च केली जाऊ शकते.
सध्या Tata Tigor चे फर्स्ट जनरेशन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात उपलब्ध आहे. ही कार जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेता कंपनी आपली जुनी मॉडेल्स नव्या अवतारात आणू शकते. पाच वर्षांनंतर या गाडीचे नवे फेसलिफ्ट मॉडेल आल्यास पुढील वर्षी कंपनीच्या विक्रीत वाढ होऊ शकते.
काय बदल होऊ शकतो?
नवीन कलर ऑप्शनसोबतच नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. एक्सटीरियर व्यतिरिक्त गाडीच्या इंटिरिअरमध्येही बदल केला जाऊ शकतो, 2025 Tata Tigor रियर एसी व्हेंट आणि फ्रंट सेंटर आर्मरेस्टसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.
10.2 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम
Tata Tigor ची इन्फोटेनमेंट सिस्टीमही अपग्रेड केली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे की ग्राहकांना वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट करणारी 10.2 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. याशिवाय वायरलेस चार्जिंग सपोर्ट, सिंगल पेन सनरूफ यांसारख्या खास फीचर्सचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
इंजिन बदलण्याची फारशी आशा नाही, फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कंपनी सध्याच्या मॉडेलमध्ये मिळणारे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन वापरू शकते.
तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटाच्या नव्या कारचा पर्याय देखील पाहू शकता. तसेच त्याचाही विचार करू शकता. कारण, टाटाची कार जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये नवीन डिझाईन आणि फीचर्ससह लॉन्च केली जाऊ शकते.