Tecno Phantom V Fold स्मार्टफोन अखेर लाँच, सॅमसंग गॅलक्सी Z फोल्डशी करणार स्पर्धा; जाणून घ्या वैशिष्ट्ये
फोल्डबल स्मार्टफोनची मोबाईलप्रेमींमध्ये क्रेझ आहे. एकापेक्षा एक सरस असे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. आता यात आणखी एका स्मार्टफोनची भर पडली आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षात फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ वाढत चालली आहे. मोबाईलप्रेमींकडे फोल्डेबल स्मार्टफोनचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.यामध्ये सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड, शिओमी मिक्स फोल्ड 2, होनोर माजिक व्हीएस आणि विवो एक्स फोल्ड यांचा समावेश आहे. आता यात टेक्नो फँटम व्ही फोल्डची भर पडली आहे. हा स्मार्टफोन नुकताच बार्सिलोना येथील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये सादर करण्यात आला. डावीकडून उजवीकडे फोल्ड होणारा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर गॅलक्सी झेड फोल्ड 4 च्या तुलनेत या स्मार्टफोनची स्क्रिन मोठी आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम, ड्युअल 5 जी प्रोसेसर असून बॅटरी जपून वापरण्यात सक्षम आहे.
स्मार्टफोनमध्ये काय आहे खासियत
टेक्नो फँटम व्ही फोल्ड स्मार्टफोन जेव्हा फोल्ड केलेला असतो, तेव्हा त्याची स्क्रिन 6.42 इंच अमोलेड कव्हर डिस्प्लेसह 1080×2250 रिझ्युलेशन आणि रिफ्रेश रेट 120 एचझेड आहे. हा फोन ओपन केल्यानंतर या स्मार्टफोनची स्क्रिन 7.85 इंच होते. ही स्क्रिन सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 4 च्या तुलनेत मोठी आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 9000+ चिपसेट आहे. अशीच चिपसेट ओप्पो फाईंड एन2 फ्लिपमध्ये आहे.
Premium in look. ✅ Friendly to skin. ✅Explore more: https://t.co/EUDKv9xid9#TECNO #MWC23 #TECNOxMWC23 #PHANTOMVFold #BeyondTheExtraordinary pic.twitter.com/Q0LbE3PoZm
— tecnomobile (@tecnomobile) March 1, 2023
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. मागच्या बाजूला 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा असून दुसरा 50 एमपी 2x झूम कॅमेरा आणि 13 एमपी अल्ट्रावाईड कॅमेरा आहे. तर पुढच्या बाजूस दोन सेल्फी कॅमेरे आहेत. 13 एमपीचा फ्रंट स्क्रिनवर आणि 16 एमपीचा आतमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी दिली असून 45 वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो.
Lightweight yet strong! Check out the aerospace-grade innovative drop-shaped hinge of #PHANTOMVFold, which is virtually seamless and crease-free. ? https://t.co/EUDKv9xid9#TECNO #MWC23 #TECNOxMWC23 #BeyondTheExtraordinary pic.twitter.com/JDSSjy0LE7
— tecnomobile (@tecnomobile) March 2, 2023
काय आहे टेक्नो व्ही फोल्डची किंमत
टेक्नो फँटम व्ही फोल्ड हा स्मार्टफोन भारतात दुसऱ्या तिमाहीत दाखल होतील. हा स्मार्टफोन स्टोरेज व्हेरियंटसह उपलब्ध असेल. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 89,999 रुपये आणि 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 99,999 रुपये इतकी असेल. सुरुवातीचे काही फोन कंपनी 79,999 रुपयात ग्राहकांना देईल असं सांगण्यात येत आहे.