Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000mAh बॅटरी, Octa Core प्रोसेसरसह Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच, JioPhone Next ला टक्कर

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी Tecno ने भारतात आणखी एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. नवीन फोन Tecno Pop 5 LTE नावाने लॉन्च करण्यात आला आहे. Tecno Pop 5 LTE 32GB डिफॉल्ट स्टोरेजसह 2GB RAM च्या एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.

5000mAh बॅटरी, Octa Core प्रोसेसरसह Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच, JioPhone Next ला टक्कर
Tecno Pop 5 LTE
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 1:56 PM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी Tecno ने भारतात आणखी एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. नवीन फोन Tecno Pop 5 LTE नावाने लॉन्च करण्यात आला आहे. Tecno Pop 5 LTE 32GB डिफॉल्ट स्टोरेजसह 2GB RAM च्या एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. 256GB पर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी हँडसेटमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ब्रँडच्या पॉप लाइनअप अंतर्गत हे पहिले डिव्हाईस आहे. हा स्मार्टफोन 6,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत विकला जात आहे आणि त्याची शिपिंग 16 जानेवारीपासून सुरू होईल.

Tecno Pop 5 LTE Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो. Tecno Pop 5 LTE HD+ रिझोल्यूशन, 480 nits ब्राइटनेस आणि 120 Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52 इंच डॉट-नॉच डिस्प्लेसह येतो. हा फोन पंच-होल डिस्प्ले 20:9 रेशो आणि 90 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. हा फोन 2 GB RAM सह 2 GHz क्वाड-कोर MediaTek Helio A25 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

Tecno Pop 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स

फोनच्या वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच आहे. स्मार्टफोन ड्युअल-टोन बॅक पॅनेलसह येतो ज्यामध्ये रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे. हा फोन IPX4 सर्टिफाइड स्प्लॅश-रेसिस्टेंट देखील आहे. Pop 5 LTE MediaTek च्या octa-core 12nm Helio A25 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन Android 11 (Go Edition) HiOS 7.6 स्किनसह बूट करतो.

या फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाल्यास Pop 5 LTE मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल सेन्सर आहे. मागील बाजूस ड्युअल फ्लॅश लाइट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात f/2.0 अपर्चरसह 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Tecno Pop 5 LTE चं डिझाईन

Tecno Pop 5 LTE Ice Blue, DPC Luster आणि Turquoise Cyan कलर ऑप्शन्समध्ये येतो. Tecno Pop 5 LTE मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशनचा सपोर्ट आहे. हा फोन हिंदी, बंगाली, उर्दू, मराठीसह 14 भारतीय भाषांच्या सपोर्टसह येतो.

Tecno चा अल्ट्रा अफोर्डेबल स्मार्टफोन ब्लूटूथ v4.2, GPS, FM रेडिओ, एक 3.5mm हेडफोन जॅक, एक मायक्रो-USB पोर्ट, Wi-Fi 802.11 b/g/n, GPRS, 4G LT यासारख्या दमदार फीचर्ससह सुसज्ज आहे.

इतर बातम्या

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग या गोष्टींची काळजी, अन्यथा मोठं नुकसान होईल

अवघ्या 15 मिनिटात फुल चार्ज होणारा Xiaomi चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Truke चे किफायतशीर AI इनेबल एअरबड्स लाइट आणि BTG3 लाँच; किंमत…

(Tecno Pop 5 LTE budget smartphone launched in India, know price and features)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.