Tecno च्या बजेट फोनची आजपासून विक्री, JioPhone Next ला टक्कर

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी Tecno ने नुकताच भारतात आणखी एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. नवीन फोन Tecno Pop 5 LTE नावाने लॉन्च करण्यात आला आहे.

Tecno च्या बजेट फोनची आजपासून विक्री, JioPhone Next ला टक्कर
Tecno Pop 5 LTE
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 6:00 AM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी Tecno ने नुकताच भारतात आणखी एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. नवीन फोन Tecno Pop 5 LTE नावाने लॉन्च करण्यात आला आहे. Tecno Pop 5 LTE 32GB डिफॉल्ट स्टोरेजसह 2GB RAM च्या एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. 256GB पर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी हँडसेटमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ब्रँडच्या पॉप लाइनअप अंतर्गत हे पहिले डिव्हाईस आहे. हा स्मार्टफोन 6,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत विकला जात आहे आणि त्याची शिपिंग आजपासून (16 जानेवारी) सुरू होईल.

Tecno Pop 5 LTE Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो. Tecno Pop 5 LTE HD+ रिझोल्यूशन, 480 nits ब्राइटनेस आणि 120 Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52 इंच डॉट-नॉच डिस्प्लेसह येतो. हा फोन पंच-होल डिस्प्ले 20:9 रेशो आणि 90 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. हा फोन 2 GB RAM सह 2 GHz क्वाड-कोर MediaTek Helio A25 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

Tecno Pop 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स

फोनच्या वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच आहे. स्मार्टफोन ड्युअल-टोन बॅक पॅनेलसह येतो ज्यामध्ये रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे. हा फोन IPX4 सर्टिफाइड स्प्लॅश-रेसिस्टेंट देखील आहे. Pop 5 LTE MediaTek च्या octa-core 12nm Helio A25 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन Android 11 (Go Edition) HiOS 7.6 स्किनसह बूट करतो.

या फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाल्यास Pop 5 LTE मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल सेन्सर आहे. मागील बाजूस ड्युअल फ्लॅश लाइट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात f/2.0 अपर्चरसह 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Tecno Pop 5 LTE चं डिझाईन

Tecno Pop 5 LTE Ice Blue, DPC Luster आणि Turquoise Cyan कलर ऑप्शन्समध्ये येतो. Tecno Pop 5 LTE मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशनचा सपोर्ट आहे. हा फोन हिंदी, बंगाली, उर्दू, मराठीसह 14 भारतीय भाषांच्या सपोर्टसह येतो.

Tecno चा अल्ट्रा अफोर्डेबल स्मार्टफोन ब्लूटूथ v4.2, GPS, FM रेडिओ, एक 3.5mm हेडफोन जॅक, एक मायक्रो-USB पोर्ट, Wi-Fi 802.11 b/g/n, GPRS, 4G LT यासारख्या दमदार फीचर्ससह सुसज्ज आहे.

इतर बातम्या

Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?

मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

(Tecno Pop 5 LTE budget smartphone shipping starts from today, know price and features)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.