50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी, Tecno चा पहिला 5G फोन भारतात लॉन्चिंगसाठी सज्ज

मोठ्या प्रतीक्षेनंतर टेक्नो (Tecno) ही स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांचा पहिला 5G स्मार्टफोन टेक्नो पोव्हा 5जी (Tecno Pova 5G) भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. 8 फेब्रुवारी रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल.

50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी, Tecno चा पहिला 5G फोन भारतात लॉन्चिंगसाठी सज्ज
Tecno Pova 5g (फोटो क्रेडिट- Tecno)
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 4:59 PM

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर टेक्नो (Tecno) ही स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांचा पहिला 5G स्मार्टफोन टेक्नो पोव्हा 5जी (Tecno Pova 5G) भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. 8 फेब्रुवारी रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. Tecno चा पहिला 5G फोन म्हणून हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नायजेरियामध्ये लॉन्च करण्यात आला होता. या फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल आणि 16W फास्ट चार्जिंगसह 6000 mAh बॅटरी दिली जाईल. यासोबतच Techno आपला पोव्हा 5जी (Pova 5G) फोन मेमरी फ्यूजन तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते. कंपनी या फोनचं कोणतं स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच करणार आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र Tecno Powa 5G फोन नायजेरियामध्ये 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेजसह लॉन्च झाला आहे. त्यामुळे भारतात देखील तेच व्हेरिएंट सादर केलं जाण्याची अधिक शक्यता आहे.

नायजेरियामध्ये या फोनच्या स्टोरेज व्हेरिएंटची किंमत NGN 1,29,000 (जवळपास 23,100 रुपये) इतकी आहे. भारतात लाँचिंगनंतर या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon द्वारे केली जाईल.

टेक्नो पोवा 5 जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

असे मानले जाते की भारतीय व्हेरिएंट नायजेरियामध्ये लॉन्च केलेल्या Tecno Powa 5G सारखेच असेल. नायजेरियामध्ये लॉन्च केलेल्या Tecno Powa 5G मध्ये 6.95 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. या फोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 900 प्रोसेसर आहे. तसेच हा फोन 8 GB LPDDR5 रॅम सपोर्टसह येतो.

Tecno Powa 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यामध्ये 50 MP चा प्रायमरी सेन्सर आहे. एक 2 मेगापिक्सेलची सेकेंडरी लेन्स आणि AI लेन्स देखील दिली आहे. या फोनच्या फ्रंट डिस्प्लेमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर आणि ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. फोनमध्ये 128GB UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज स्पेस दिली जाईल. या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी आणि 16W चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. या फोनचं भारतीय व्हर्जन Tecno Powa 5G च्या नायजेरियन व्हर्जनसारखंच असणे अपेक्षित आहे.

इतर बातम्या

Jio Network Down मुळे वैतागलेल्या ग्राहकांना Reliance चे ‘अमर्याद’ गिफ्ट, किती दिवसांसाठी मोफत डाटा?

Meta च्या मुल्यात 250 अब्ज डॉलर्सची घट, जाणून घ्या फेसबूकच्या अडचणी वाढण्याची कारणं

12GB/512GB, Narzo 50 सह Realme GT 2 सिरीज भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या दोन्ही फोनमध्ये काय असेल खास?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.