एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच
या स्मार्टफोनचा पहिला सेल फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर 25 डिसेंबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. | Tecno Spark 6 Go
मुंबई: टेक्नोने (Tecno) आज त्यांचा किफायतशीर स्मार्टफोन Tecno Spark 6 Go भारतात लाँच केला. हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच आणि डुअल रियर कॅमरा सेटअपने लेस आहे. या स्मार्टफोनच्या 4 GB RAM + 64 GB स्टोरेज असलेल्या वेरियंटची किंमत 8,699 रुपये आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर 40 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम किंवा 54 तासांचा टॉक-टाइम प्रदान करतो. (Tecno Spark 6 Go features specifications)
या स्मार्टफोनचा पहिला सेल फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर 25 डिसेंबर दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. तसेच 7 जानेवारीपासून तुम्ही हा स्मार्टफोन ऑफलाईन स्टोरमधूनही खरेदी करु शकाल. या फोनवर सध्या कंपनीने इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून 200 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे हा फोन फ्लिपकार्टवरुन 8,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Tecno Spark 6 Go स्मार्टफोन्सची फिचर्स
या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचांचा HD+ TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचे रिझॉल्युशन 720×1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये octa core MediaTek Helio A25 SoC प्रोसेसर आहे. या फोनची बॅटरी 5000 mAh इतकी आहे. तसेच यामध्ये ड्युअर रियर कॅमेरा सेटअपची सुविधा असून प्रायमरी सेंसर 13 मेगापिक्सल इतका आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Aqua Blue, Ice Jadeite आणि Mystery White या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
याशिवाय, कंपनीने 99 दिवसांची स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर देऊ केली आहे. जेणेकरुन तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यास तुम्हाला स्क्रीन रिप्लेस करुन मिळू शकते. हा स्मार्टफोनची किंमत Samsung Galaxy M01s, Redmi 9i आणि Realme C3 या स्मार्टफोनच्या रेंजमध्ये आहे.
संबंधित बातम्या:
विक्रीच्या बाबतीत iPhone 12 कडून जुने रेकॉर्ड मोडीत, ठरला बेस्ट सेलिंग 5G स्मार्टफोन
iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!
जुना अँड्रॉइड फोन द्या अन् नवा आयफोन घ्या, ‘iPhone 12’वर तब्बल 22 हजारांचा घसघशीत ‘डिस्काउंट’
(Tecno Spark 6 Go features specifications)