Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tecno Spark 9T : 7 जीबी रॅम आणि 50 मेगापिक्सेलचा स्वस्त फोन, किंमत अवघी 9299 रुपये

बजेटमध्ये बसणारा चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर Tecno Spark 9T हा उत्तम पर्याय आहे 7 जीबी रॅम आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा हा नवा फोन लॉंच झाला असून त्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Tecno Spark 9T : 7 जीबी रॅम आणि 50 मेगापिक्सेलचा स्वस्त फोन, किंमत अवघी 9299 रुपये
Tenco SparkImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:51 PM

मुंबई : जर तुम्ही बजेटमध्ये बसणारा, चांगला स्मार्टफोन (Smart phone)शोधत असाल तर Tecno Spark 9T हा एक उत्तम पर्याय आहे. भारतात हा फोन नुकताच लॉंच झाला आहे. टेक्नो ब्रँडचा (Techno Brand) हा स्मार्टफोन असून 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असणाऱ्यांची गरज ओळखून त्या फीचर्स (Features) सह बाजारात आला आहे. त्यामध्ये 7 जीबी रॅम आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. Redmi 10 आणि Realme C35 सह या रेंजमधील बाजारातील अनेक स्मार्टफोनशी टेक्नो स्पार्क 9टी ची स्पर्धा आहे. या फोनचे फीचर्स काय आहेत, भारतात त्याची किंमत काय आहे, आणि तो खरेदीसाठी कधीपासून उपलब्ध असेल, या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊया.

Tecno Spark 9T Price in India: जाणून घ्या किंमत

हा नवा टेक्नो मोबाईल अगदी बजेट फ्रेंडली आहे. 9299 रुपयांसह बाजारात दाखल झाला आहे. या स्मार्टफोनचे चार रंग उपलब्ध असतील. ॲटलांटिक ब्ल्यू ( Atlantic Blue), आयरिस पर्पल (Iris Purple), ताहिती गोल्ड (Tahiti Gold) आणि टरकॉइज स्यान (Turquoise Cyan) अशा चार रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. 6 ऑगस्ट 2022 पासून हा फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

जाणून टेक्नो स्पार्क 9टी फोनची वैशिष्ट्ये

डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचांचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. तसेच फोनच्या पुढच्या भागात वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच उपलब्ध असेल. हा फोन 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 401 पिक्सल प्रति इंच पिक्सल डेन्सिटी सह बाजारात लॉंच करण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप : टेक्नो स्पार्क 9टी स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा आणि एक आय-लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे.

बॅटरी : या फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट सह 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 1 तासापेक्षा कमी काळात फोनची बॅटरी 50 टक्के चार्ज होऊ शकते, असा दावा टेक्नो कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

रॅम : या फोनमधील रॅम 4 जीबी असली तर 3 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह तुम्ही ती 7 जीबी पर्यंत वाढवू शकता.

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी टेक्नो स्पार्क 9टी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट चा वापर करण्यात आला आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.