WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

Telegram ने युजर्ससाठी एक नवं फीचर जोडलं आहे, ज्यामध्ये ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये रूपांतरित (कन्व्हर्ट) करू शकतात.

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा
Telegram
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 6:27 PM

मुंबई : टेलिग्राम (Telegram) सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स देत आहे. कंपनीने आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक फीचर जोडलं आहे, ज्यामध्ये ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये रूपांतरित (कन्व्हर्ट) करू शकतात. टेलिग्रामच्या iOS, Android आणि डेस्कटॉप अ‍ॅप्सच्या लेटेस्ट व्हर्जन्समध्ये युजर्स हे फीचर वापरू शकतात. (Telegram Adds video call feature, Screen Sharing to counter whatsapp)

याव्यतिरिक्त, युजर्सना एखाद्याचा व्हिडिओ फीड पिन करण्याचा पर्याय देखील मिळेल जेणेकरून नवीन व्यक्ती कॉलमध्ये सहभागी झाली तरीही पिन केलेली व्यक्ती सेंटरला राहील. Engadget च्या रिपोर्टनुसार, युजर्स आपली स्क्रीन शेअर करु शकतात. कॅमेरा फीड आणि स्क्रीन दोन्ही गोष्टी एकाच वेळी शेअर करण्याचा पर्यायदेखील युजर्सना मिळेल.

एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल

टेलिग्राम व्हिडीओ कॉलवर एकाच वेळी 30 जण सहभागी होऊ शकतात. परंतु ही लिमिट वाढवली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. टेलिग्रामने म्हटले आहे की, लाईव्ह इव्हेंट्स आणि इतर नवीन फीचर्स सपोर्ट करण्यासाठी व्हॉईस चॅटचा विस्तार केला जात आहे. युजर्स फोनवर, तसेच टॅब्लेट आणि कम्प्युटरवरुन ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये भाग घेऊ शकतात.

यापूर्वी, टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव्ह यांनी आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये ही घोषणा केली होती, त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की “आम्ही मे महिन्यात आमच्या व्हॉईस चॅटमध्ये व्हिडीओ फीचर जोडणार आहोत, ज्यामुळे टेलिग्राम ग्रुप व्हिडीओ कॉलसाठी एक शक्तिशाली प्लॅटफॉर्म बनेल.

WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा

युजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे. अशा युजर्सना दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत. कारण आता तुम्ही तुमचे WhatsApp चॅट्स Telegram वर मूव्ह करु शकता. Telegram काही महिन्यांपूर्वी नवं फिचर रोलआऊट केलं आहे, जे सध्या अँड्रॉयडवर उपलब्ध आहे. या फिचरच्या मदतीने WhatsApp युजर्स त्यांचे चॅट्स आणि मल्टीमीडिया फाईल्स आरामात टेलिग्रामवर शिफ्ट करु शकतात. हे चॅट एक्सपोर्ट फिचर आयफोन युजर्ससाठीदेखील रोलाऊट करण्यात आलं आहे.

टेलिग्रामवर चॅट एक्सपोर्ट कसं कराल?

1. तुम्ही जर अँड्रॉयड फोन वापरत असाल तर सर्वात आधी तुम्ही WhatsApp चॅट ओपन करा.

2. कोपऱ्यात तीन डॉट्स असलेला एक पर्याय आहे त्यावर क्लिक करा.

3. तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या पर्यायांपैकी मोअर (More) या पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुम्हाला एक्सपोर्ट चॅट असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

5. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर शेअर मेनू ओपन होईल. त्यामध्ये टेलिग्रामची निवड करा.

इतर बातम्या

‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर

OnePlus Community Sale : मोबाईलपासून स्मार्ट टीव्हीपर्यतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट

नवा फोन घेताय? ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी

(Telegram Adds video call feature, Screen Sharing to counter whatsapp)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.