मोबाईल चार्जिंग पॉइंट अन्‌ ब्लुटूथने वाढवली नवीन स्प्लेंडरची शान… लूकची रंगली चर्चा

या बाईकची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 72 हजार 900 आहे. 100 सीसी असलेल्या या बाईकमध्ये खूप नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही नवीन स्प्लेंडर प्लस एक्सटेक 5 वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध होणार आहे.

मोबाईल चार्जिंग पॉइंट अन्‌ ब्लुटूथने वाढवली नवीन स्प्लेंडरची शान... लूकची रंगली चर्चा
Splendor Plus xtec
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 5:52 PM

असं म्हणतात, की चांगल्या गोष्टींचे दिवस नाही तर काळ असतो. असचं काहीस हिरो स्प्लेंडरबाबत म्हणावं लागेल. एक काळ होता की प्रत्येक दुसर्या व्यक्तीच्या दारात तुम्हाला तेव्हाच्या हिरो-होंडा या कंपनीची स्प्लेंडर लागलेली दिसायची. अगदी कॉलेज कुमारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्प्लेंडर आता अजूनच खास आकर्षक ढंगात ग्राहकांच्या भेटीला येत आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये येत असलेल्या स्प्लेंडरचे नाव स्प्लेंडर प्लस एक्सटेक (Splendor Plus xtec) ठेवण्यात आले आहे. या बाईकची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत (Ex-showroom price) 72 हजार 900 आहे. 100 सीसी असलेल्या या बाईकमध्ये खूप नवीन तंत्रज्ञानाचा (technology) वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही नवीन स्प्लेंडर प्लस एक्सटेक 5 वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध होणार आहे.

काय असणार खास?

टेक्नॉलॉजीबाबत बोलायचे झाल्यास न्यू हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकमध्ये ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीसह फूल डिजिटल मीटर देण्यात आलेले आहे. सोबतच यात, कॉल आणि एसएमएस सुविधेचा सपोर्टही देण्यात आलेला आहे. नवीन बाईकमध्ये रियल टाइम मायलेज इंडिकेटरदेखील देण्यात आले आहे. यात लो फ्यूअल इंडिकेटरचाही समावेश करण्यात आला आहे. यात एलईडी हाई इंटेनसिटी पोजिशन लॅंप उपलब्ध होणार आहे. या बाईकमध्ये कंपनीने युएसबी चार्जरदेखील जोडले आहे. यात साइड स्टँड इंजीन कट ऑफचा देखील पर्याय उपलब्ध असणार आहे. यात प्रसिध्द आई3एस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात एक आयडल स्टॉप स्टार्ट सिस्टीम देण्यात आलेली आहे.

आकर्षक लूक

डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकमध्ये एक पोजिशन लँप आणि नवीन ग्राफीक्स देण्यात येणार आहे. या बाईकला चार कलर व्हेरिएंटमध्ये बाजार आणले जाणार आहे. त्यात, स्पार्कलिंग बेटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टोरनाडो ग्रे आणि पर्ल व्हाईटचा समावेश असणार आहे. हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकमध्ये 97.2 सीसी बीएस-6 इंजीन देण्यात आले आहे. 7000 आरपीएमवर 7.9 बीएचपीची पॉवर मिळणार आहे. तसेच 6000 आरपीएमवर 8.05 एनचा पीक टार्क जनरेट होणार आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.