Smartphone | आपोआप बदलेल रंग, चार्ज होईल हवेतच, कोणता आहे हा स्मार्टफोन
Smartphone | Infinix कंपनीने कमाल केली आहे. त्यांनी लास वेगास येथे सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक शोमध्ये अनेक नवीन उत्पादनं बाजारात उतरवली आहे. या शोमध्ये इनफिनिक्सने तीन तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्टफोन दाखल केला. त्यात रंग बदलणारा स्मार्टफोन आणि एअर चार्ज, Infinix Extreme Temp बॅटरी दाखल केली आहे. काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये
नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : लास वेगास येथील इलेक्ट्रॉनिक शोमध्ये भन्नाट उत्पादनं सादर करण्यात येत आहे. कंपन्यांनी कल्पनेची भरारी घेत, अनेक जोरदार, दमदार आणि हटके उत्पादनं सादर केली आहेत. यामध्ये Infinix ही कंपनी पण मागे नाही. कंपनीने कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये ( CES 2024) रंग बदलणारा स्मार्टफोन दाखल केला आहे. या नव तंत्रज्ञानाआधारे युझर्सला त्याच्या मनाजोगते रंग बदलण्याची सुविधा मिळते. या रंग बदलासाठी बॅटरी पण खर्च होणार नाही. या स्मार्टफोसोबत कंपनीने एअरचार्ज आणि एक्स्ट्रिम टेम्प बॅटरी डिव्हाईस बाजारात आणले आहे. अजून काय आहेत वैशिष्ट्ये…
Infinix E Colour तंत्रज्ञान
इनफिनिक्सच्या या नवीन तंत्रज्ञानामध्ये E Ink Prism 3 चा वापर करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने युझर्स त्यांचा स्मार्टफोन अगदी सोप्या पद्धतीने कस्टमाईज करु शकतील. त्यासाठी बॅटरीचा वापर होणार नाही. हे तंत्रज्ञान मायक्रोस्ट्रक्चरचा वापर करते. त्याचे कलर पार्टिकल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज करतात. यावर वेगवेगळे वोल्टेज अप्लाय झाल्यावर इलेक्ट्रिक फिल्ड बदलते. त्यामुळे मायक्रोस्ट्रक्चरवरील कलर पार्टिकल्स हालचाल करतात. परिणामी रंग बदलतो. Infinix च्या दाव्यानुसार युझर्स या स्मार्टफोनचा रंग त्यांच्या मर्जीनुसार बदलवू शकतात.
Infinix Air Charge
- याशिवाय कंपनीने Air Charge आणि एक्स्ट्रीम टेम्परेचर बॅटरी पण बाजारात आणली आहे. एअरचार्ज मल्टी कॉईल मॅग्नेटिंग रेझोनेंस आणि अडॉप्टिव्ह एल्गोरिद्मचा वापर करते.
- वायरलेस पद्धतीने हा मोबाईल चार्ज होतो. हे उत्पादन 20 CM आणि 60 Degree एंगलपर्यंत डिव्हाईसला चार्ज करु शकते.
- डिव्हाईसच्या सुरक्षेसाठी फ्रीक्वेन्सी 6.78MHz पेक्षा ठेवण्यात येते आणि 7.5 ची पॉवर देते.
- गेमिंग खेळताना आता अडचण येणार नाही. डेस्कवर ठेवल्या ठेवल्या डिव्हाईस चार्ज होईल.
- Extreme Temp बॅटरीमुळे अधिक उष्ण आणि जास्त थंडीत बॅटरी फेल होण्याची अडचण दूर होईल.
- या तंत्रज्ञानामुळे बॅटरी उणे 40 डिग्री सेल्सियस तापमानात सुद्धा कार्यरत राहील.
- कंपनीने अद्याप या स्मार्टविषयी इतर बाबी समोर आणल्या नाहीत.
- कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती दिली नाही.