Gaming laptop: बेस्ट प्रोसेसर अन् दमदार ग्राफिक्स असलेले ‘हे’ चार गेमिंग लॅपटॉप
Gaming laptop: काही लोकांकडून लॅपटॉपवर अतिशय थरारक पध्दतीने गेमिंग करण्यात येत असते. अशा लोकांसाठी आज आम्ही या लेखातून काही बजेट गेमिंग लॅपटॉपबाबतची माहिती, स्पेसिफिकेशन्स तसेच त्यात वापरण्यात आलेल्या टेक्नॉलॉजीबाबत माहिती देणार आहोत.
मुंबई : बाजारात अँड्रोइड स्मार्टफोनसाठी (Android smartphone) विविध प्रकारचे गेमिंग ॲप्स उपलब्ध आहेत. यातीलच एक प्रसिध्द असा बॅटेल ग्राउंड मोबाईल इंडियन (Battle Ground Mobile Indian) नावाचा गेम आहे. याचेच जुने नाव पबजी राहिले आहे. याशिवाय अनेक गेमदेखील खूप प्रसिध्द आहे. परंतु मोबाईलवर असे गेम खेळताना पाहिले तसा ‘फील’ येत नसल्याने काही लोकांकडून लॅपटॉपवर अतिशय थरारक पध्दतीने गेमिंग करण्यात येत असते. अशा लोकांसाठी आज या लेखातून काही बजेट गेमिंग लॅपटॉपबाबची (Gaming laptop) माहिती देणार आहोत. या लॅपटॉपना तुम्ही ऑैफलाईनसह अॅमेझॉन तसेच फ्लिपकार्टवरुनही खरेदी करु शकणार आहात.
- Lenovo ideaPad Gaming : लेनोवाचा हा गेमिंग लॅपटॉप 3 कोर आई 5 आणि 10 जनरेशनसह उपलब्ध आहे. यात 8 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी स्टोरेज उपलब्ध आहे. यात 4 जीबीपर्यंत ग्राफिक्स कार्ड/एनव्हिडिओ जीफोर्स जीटीएक्स देण्यात आलेले आहेत. यात 15.6 इंचाचा फूल एचडी एलईडी बेकलिट अँटी ग्लेयर आईपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात रिफ्रेश रेट 120Hz आहे. सोबतच यात विंडोज 10 ओएस देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर याची किंमत 53 हजार 990 रुपये आहे.
- MSI GF56 Thin : या लॅपटॉपला 82 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी केले जाउ शकते. हा कोर आई7 10 जनरेशनसह उपलब्ध आहे. यात 16 जीबीची रॅम आणि 1 टीबीचे एसएसडी कार्ड स्टोरेज देण्यात आले आहे. हा लॅपटॉप एनवीडिया जीफोर्स आरटीएक्स 3060 सोबत उपलब्ध आहे. यात 15.6 इंचाची फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. यात विंडोज 10 ओएस प्री इंस्टॉल करण्यात आले आहे.
- ASUS ROG Strix G15 Ryzen 7 : असूसचा हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर 83 हजार 990 रुपयांना खरेदी केला जाउ शकतो. यात 15.6 इंचाची फूल एचडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा एक लाइटवेट लॅपटॉप आहे. यात 8 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी स्टोरेज देण्यात आलेला आहे. यात, विंडोज 11 ओएस प्री-इंस्टोल आहे. यात 4 जीबीचे ग्राफिक्स कार्ड देण्यात येणार आहे. हा एक गेमिंग लॅपटॉप आहे.
- Acer Nitro 5 Ryzen 7 : एसरचा हा लॅपटॉप 94900 रुपयांना उपलब्ध आहे. हा लॅपटॉप दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात एक 16 जीबी रॅम आणि 1 टीबी एचडीडी स्टोरेजसह येतो, तर दुसरा 16 जीबी रॅम आणि 256 जीबी एसएसडीसह उपलब्ध आहे. यात 6 जीबी ग्राफिक्स कार्ड आहेत. यात 15.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचे वजन 2.4 किलोग्राम इतके आहे.
हे सुद्धा वाचा