Auto Expo 2025 मध्ये ‘या’ लक्झरी कार, उत्तम फीचर्ससह लूकही खास, जाणून घ्या
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये यावेळी अनेक शानदार कार पाहायला मिळणार आहेत. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये पाहायला मिळणाऱ्या काही खास गाड्यांची आम्ही तुम्हाला पुढे दिली आहे. विशेष म्हणजे तुम्ही याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि इतरही बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकता.
ऑटो एक्स्पो 2025 मध्येही अतिशय शानदार कार पाहायला मिळणार आहेत. हो आम्ही सत्य सांगत असून त तुम्हाला देखील या कार पाहण्याची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे यात तुम्हाला सगळं काही जाणून देखील घेता येईल. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये तुम्ही एकाच ठिकाणी इतका सगळ्या कार पाहू शकता.
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जानेवारी महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच महिन्यात भारतातील सर्वात मोठा ऑटो शो ऑटो एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये जगभरातील बड्या कार कंपन्या आपल्या नवीन कार लाँच करतात.
यावेळी ऑटो एक्स्पो 2025 मध्येही अतिशय शानदार कार पाहायला मिळणार आहेत. चला तर मग पाहूया ऑटो एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित होऊ शकणाऱ्या काही कारविषयी सविस्तर माहिती.
एमजी सायबरस्टर
एमजी सायबरस्टर ही एक आलिशान इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे. हे खास भारतासाठी बनवले जाणार आहे. यात 77 किलोवॅटची बॅटरी असेल. तसेच, दोन इलेक्ट्रिक मोटर्स (ड्युअल मोटर) 510 पीएस पॉवर आणि 725 एनएम टॉर्क जनरेट करतील. ही कार केवळ 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. शिवाय, याची डब्ल्यूएलटीपी रेंज 444 किमी आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 444 किमी धावू शकते.
स्कोडा ऑक्टेव्हिया आरएस
स्कोडा ऑक्टेव्हिया आरएसमध्ये 2.0 लीटर, ४ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 265 पीएस पॉवर आणि 370 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 6.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. याची टॉप स्पीड 250 किमी प्रति तास आहे.
पोर्श मैकन इलेक्ट्रिक
पोर्श मॅकन इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये हे प्रदर्शन केले जाईल. याचे तीन प्रकार आहेत. पहिली मॅकन इलेक्ट्रिक, दुसरी मॅकन 4 एस इलेक्ट्रिक आणि तिसरी आहे मॅकन टर्बो इलेक्ट्रिक. मॅकन टर्बो इलेक्ट्रिकमध्ये 100 किलोवॉट ची बॅटरी आणि 639 पीएस पॉवर आणि 1130 एनएम टॉर्क आहे. यामुळे अवघ्या 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. याची रेंज 591 किमी असेल.
पोर्शे तायकन
पोर्शे टायकन फेसलिफ्ट ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सादर केली जाईल. यात 89 किलोवॉट आणि 105 किलोवॅट बॅटरीचा पर्याय आहे. हे इंजिन 884 पीएस पॉवर आणि 890 एनएम टॉर्क जनरेट करेल. ही कार केवळ 2.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
पोर्शे पानामेरा
थर्ड जनरेशन पोर्श पनामेरा ऑटो एक्स्पो 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. यात नवीन आणि सुंदर डिझाईन असणार आहे. एंट्री लेव्हल मॉडेल 353 पीएस पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करेल. दुसरीकडे, पनामेरा जीटीएसमध्ये 4-लीटर व्ही 8 टर्बो इंजिन असेल. हे इंजिन 500 पीएस पॉवर आणि 660 एनएम टॉर्क जनरेट करेल.
मर्सिडीज-बेंझ जी 580 (ईक्यूजी)
मर्सिडीज-बेंझ जी 580 (ईक्यूजी) ही जी-क्लासची इलेक्ट्रिक एडिशन आहे. ऑटो एक्स्पो 2025 मध्ये तो दिसणार आहे. यात 116 किलोवॅटची बॅटरी आणि 4 इलेक्ट्रिक मोटर्स असतील. ही कार 587 पीएस पॉवर आणि 1,164 एनएम टॉर्क जनरेट करेल. ही एसयूव्ही 360 डिग्री फिरण्यास सक्षम आहे.
मर्सिडीज-एएमजी एसएल 55
मर्सिडीज-एएमजी एसएल 55 ही हाय परफॉर्मन्स रोडस्टर आहे. ही कार 476 पीएस पॉवर आणि 700 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. याची टॉप स्पीड 295 किमी प्रति तास आहे.