गुगल प्ले स्टोअरवरुन कॉल रेकाँर्डिग ॲप होणार डिलिट… चिंता नको असा काढा मार्ग
गुगल प्ले स्टोअरने आपल्या पॉलिसींमध्ये काही बदल केले आहेत, त्यानुसार आता यापुढे 11 मेपासून कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला कुठलेही थर्ड पार्टी ॲप्स उपलब्ध होणार नाहीत. या सर्व ॲप्सना गुगल प्ले डिलिट करणार आहे. या लेखातून जाणून घेऊया यामागे नेमकं काय कारण देण्यात आलयं.
मुंबई : गुगल प्लेकडून (google play store) आपल्या पॉलिसींमध्ये (Policy) काही बदल करण्यासाठी काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. एका रिपोर्टनुसार, गुगल प्ले स्टोअरवर 11 मेपासून कॉल रेकॉर्डिंग करत असलेल्या सर्व थर्ड पार्टी ॲप्सना डिलिट करण्यात येणार आहे. पुर्वीसारखे आता अँड्रॉइड युजर्स सरळ प्ले स्टोअरवर जाउन कॉल रेकॉर्डिंग करणारे ॲप डाउनलोड (Download) करु शकणार नाहीत. गुगलने आपल्या एपीआय पॉलिसीमध्ये बरेच बदल केले आहेत. याचा परिणाम म्हणून ते आता कॉल रेकॉर्डिंग करणारे थर्ड पार्टी ॲप्स डिलिट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु तरीही युजर्स नेहमीसारखंच कॉल रेकॉर्डिंग करु शकणार आहेत, या लेखातून त्याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत…
गुगलने का केलेत बदल
अँड्रॉइड अथॉरिटीच्या एका रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्याच्यामुळे इतर सर्व थर्ड पार्टी ॲप्स डिलिट होणार आहेत. दरम्यान, असे असले तरी सध्याच्या कॉल रिकॉर्डिंगच्या सुविधांवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ज्या कॉल रेकॉर्डिंग सुविधा मोबाईलमध्ये इनबिल्ड आहेत, त्याच्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुगलकडून सांगण्यात आल्यानुसार, नवीन पॉलिसीमुळे एक्सेसिबिलिटी एपीआय डिझाईन केली गेलेली नाही व त्यामुळे रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग केली जाउ शकत नाही.
आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत विविध अँड्रॉइड व्हर्जनमध्ये कॉल रेकाँर्डिंग करणार्या एपीआयला गुगलकडून हटविण्यात येणार आहे. विविध देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंगबाबत वेगवेगळे नियम लावण्यात आले असल्याने गुगलकडून हा निर्णय गुप्ततेच्या धोरणाला अनुसरुन घेण्यात आला आहे. गुगलने अँड्रॉइड 10 ला ब्लॉकदेखील केले आहे.
अशी करा कॉल रेकॉर्डिंग
गुगलने जरी प्ले स्टोअरमधून व्हाईस रेकॉर्डिंग ॲप्स काढले असले तरी, काही कंपन्या बाय डिफॉल्ट आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध करुन देत असतात. गुगल पिक्सल, सॅमसंग आणि शाओमी सारख्या कंपन्या आपल्या मोबाईलवर पहिल्यापासून इनबिल्ड रेकॉर्डिंगचे फिचर्स देत असतात. त्यामुळे गुगलच्या या निर्णयाच्या अशा मोबाईल्सवर कुठलाही फरक पडणार नाही. आणि तुम्ही पूर्वीप्रमाणे कॉल रेकॉर्डिंग करु शकाल.
संबंधित बातम्या :
iPhone : ‘ॲपल’ आणू शकतो, पहिला ‘पोर्टलेस आयफोन? सत्य की अफवा… जाणून घ्या, संपूर्ण माहिती