पैसे वाचवण्याचा ‘हा’ आहे एक वेगळाच मार्ग; ऑनलाईन पेंमेट करतांना या पद्धतीने वापरा कूपन कोड …. हमखास मिळेल कॅशबॅक !

आता ऑनलाईन पेंमेट चा पर्याय माहित नाही असे खुप कमी लोक आपल्या देशात आहेत. शहरात तर, खाद्यपदार्थांच्या ठेल्यापासून, भाजीवाल्यांपर्यंत सर्वांकडेच ऑनलाईन पेमेंट स्विकारले जात आहे. याच ऑनलाइन पेंमेटच्या पर्यायातून आपण अधिकाधिक कॅशबॅक कशी मिळवू शकता याबाबत काही महत्वाच्या टीप्स जाणून घेणे गरजेचे आहे.

पैसे वाचवण्याचा ‘हा’ आहे एक वेगळाच मार्ग; ऑनलाईन पेंमेट करतांना या पद्धतीने वापरा कूपन कोड .... हमखास मिळेल कॅशबॅक !
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:28 PM

सध्या कुठल्याही दुकानात पैसे भरण्यापासून ते मोबाइल रिचार्ज करण्यापर्यंत जवळपास सर्वत्र ऑनलाइन पेमेंट शक्य आहे. खरेदीच्या वेळी काही वेळा असेही होते, जेव्हा जास्त किंमतीमुळे, आपण एकतर कमी किंमतीची (Low cost) वस्तू खरेदी करतो किंवा त्यावर कॅशबॅक शोधतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्हाला बहुतांश ऑनलाइन पेमेंट करताना कॅशबॅक मिळेल. वास्तविक, ऑनलाइन शॉपिंग किंवा रिचार्जवर, आपल्याला अनेकदा कूपनबद्दल विचारले जाते आणि बर्‍याच ठिकाणी कूपन कोड एंटर करण्याचा पर्याय देखील असतो. परंतु आपल्याकडे त्या कूपनची माहिती नसल्यामुळे, आपल्याला कॅशबॅक मिळविता येत नाही. ऑनलाईन पेंमेटमध्ये कॅशबॅक कूपन (Cashback coupons) मिळविण्यासाठी काही विशीष्ट वेबसाइट आहेत, यावरून, तुम्ही आपले कुपन कलेक्ट करू शकता आणि कुठल्याही खरेदीच्या वेळी किंवा ऑनलाइन पेंमेटच्या वेळी (time of online paymate)या कूपन कोडचा वापर करून, हमखास कॅशबॅक मिळवू शकता.

वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि ऑनलाइन पेमेंट

कॅशबॅक आणि सूट मिळवण्यासाठी तुम्ही कूपन दुनिया आणि ग्रॅब ऑन सारख्या वेबसाइट वापरू शकता. या दोन्ही वेबसाइटवर कूपन कोड दिलेले आहेत, जे वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि ऑनलाइन पेमेंटसाठी वापरले जाऊ शकतात. यामध्ये प्रत्येक कोडचे डीस्क्रीपशन देखील दिले आहे. प्रोमो कोड कूपन दुनिया वर खाते तयार केल्यावरच दिसत असले तरी, ग्रॅब ऑन वर कोड लॉग इन न करता पाहता येतात. जरी काही कोडसाठी लॉगिन कोड तयार करणे आवश्यक आहे.

मोबाईल रिचार्जपासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत

या प्लॅटफॉर्मवर मोबाइल रिचार्ज करण्यापासून ते Flipkart आणि Amazon वरून ऑनलाइन ऑर्डर करण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीसाठी कूपन कोड मिळू शकतात आणि त्यावर लागू असलेल्या अटी व शर्ती देखील जाणून घेऊ शकतात. अनेक कूपन ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्मवर देखील लागू होतात जसे की Swiggy, Zomato आणि अगदी Dominos. इतकेच नाही तर अनेक वेबसाइट्सने कॅटेगरी देखील यात दिल्या आहेत, ज्यामध्ये प्रवास, रिचार्ज आणि फॅशन आणि फूड सारखे पर्याय आहेत. हे ग्रेड कोड शोधण्यात उपयुक्त आहेत. एवढेच नाही तर टाटा क्लिक इत्यादीसाठी कूपन आहेत. याशिवाय मेक माय ट्रिप सारखे कूपन देखील आहेत. दरम्यान, नियम व अटी वाचल्याशिवाय कोणताही कोड वापरू नका.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.