यूआयडीएआयने पहिल्यांदा बंद केली ही आधार कार्डची कॉमन सर्व्हिस; जाणून घ्या नेमका काय बदल झालाय

अधिकृत वेबसाईटवरून आधार कार्डच्या प्रतची प्रिंट काढण्याची सुविधा यूआयडीएआयने बंद केली आहे. (This is the first time that UIDAI has discontinued the Aadhaar card common service)

यूआयडीएआयने पहिल्यांदा बंद केली ही आधार कार्डची कॉमन सर्व्हिस; जाणून घ्या नेमका काय बदल झालाय
Aadhaar card
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 7:17 PM

नवी दिल्ली : आधार कार्ड सर्वात अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे. आपल्याला हे ठाऊकच आहे की आपण आधार कार्डवरील फोटोपासून ते पत्ता, फोन नंबर, जन्मतारीख आदी तपशीलात बदल करू शकतो. आपण कितीही बदल केले तरी आधार कार्डचा नंबर मात्र तोच राहतो. त्यामुळे ज्यावेळी कधी आपले आधार कार्ड कुठे हरवते, गहाळ होते किंवा अन्य कारणावरून त्यात बदल केला तर आपण आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार कार्डच्या दुसऱ्या प्रतची कलर प्रिंट काढू शकतो. ही सुविधा असल्यामुळे लोक आधार कार्ड हरवले तरी निश्चिंत राहत होते. (This is the first time that UIDAI has discontinued the Aadhaar card common service)

मात्र आता याबाबत पुरेशी खबरदारी घ्यावी लागणार आहे की आपले आधार कार्ड कुठे हरवणार तर नाही ना. कारण अधिकृत वेबसाईटवरून आधार कार्डच्या प्रतची प्रिंट काढण्याची सुविधा यूआयडीएआयने बंद केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला आधार कार्ड चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवावेच लागणार आहे. यूआयडीएआयने आधारच्या वेबसाईटवरून नवीन कार्ड डाऊनलोड करून प्रिंट काढण्याची व्यवस्था बंद केली आहे, त्यामुळे तुम्हाला आता दुसऱ्या तंत्राचा वापर करावा लागेल.

नवीन नियम काय आहे?

अलीकडेच आधार कार्ड हेल्पलाईनच्या ट्विटरवर एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना नवीन नियमाची माहिती देण्यात आली आहे. एका व्यक्तीने ट्विटरद्वारे विचारले होते की मी माझ्या आधार कार्डची पुन्हा प्रिंट काढू शकतो का? त्यावर आधार मदत केंद्राने सांगितले की ही सेवा आता बंद करण्यात आली आहे. अधिकृत हँडलमार्फत सांगण्यात आले की, ‘आधार पुनर्मुद्रण सेवा बंद करण्यात आली आहे. आपण ऑनलाईन माध्यमातून आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता. तुम्हाला ते लवचिक कागदाच्या स्वरूपात ठेवायचे असेल तर ई-आधारचे प्रिंट आउट मिळू शकेल.’

आधार पीव्हीसी कार्ड कसे तयार करावे?

आधार पीव्हीसी कार्ड बनविणे खूप सोपे आहे. आपण ते घरीच बनवू शकता. त्यानंतर स्पीड पोस्टद्वारे घरी पाठविले जाईल. यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीव्हीसी कार्डच्या लिंकवर क्लीक करा किंवा आपण थेट https://resident.uidai.gov.in/check-reprint-status या लिंकला भेट देऊ शकता. येथे आपणास आधार कार्डशी संबंधित माहिती विचारली जाईल. त्यानंतर तुम्हाला आलेल्या ओटीपीद्वारे पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता. यानंतर तुम्हाला फी भरावी लागेल. त्यामध्ये दिलेल्या पयार्याद्वारे तुम्ही फी भरू शकता. त्यानंतर ते तुमच्या घरी येईल.

यात विशेष काय आहे?

विशेष म्हणजे हे केवळ एक प्लास्टिक कार्ड नसेल तर त्यात बरीच वैशिष्ट्येदेखील असतील. वास्तविक, या कार्डमध्ये क्यूआर कार्ड असते, त्यात एक होलोग्राम असतो. त्यामुळे हे कार्ड एक हायटेक कार्ड बनते. हे कार्ड कुठेही घेऊन जाणे सोईस्कर आहे. हे आधार कार्डचे सर्वात नवीन व्हर्जन आहे. (This is the first time that UIDAI has discontinued the Aadhaar card common service)

इतर बातम्या

दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर

लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, शिवसेना नेत्यावर अखेर गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.