कॉलिंग फंक्शनसह Timex चं नवं स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत 6 हजारापेक्षा कमी

भारतात आपल्या प्रोडक्ट लाइनअपचा विस्तार करत, टाइमेक्सने (Timex) नवीन स्मार्टवॉच टाइमेक्स फिट 2.0 (Timex Fit 2.0) लाँच केले आहे.

कॉलिंग फंक्शनसह Timex चं नवं स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत 6 हजारापेक्षा कमी
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:05 PM

मुंबई : भारतात आपल्या प्रोडक्ट लाइनअपचा विस्तार करत, टाइमेक्सने (Timex) नवीन स्मार्टवॉच टाइमेक्स फिट 2.0 (Timex Fit 2.0) लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फंक्शन देण्यात आले आहे. तसेच हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन सेन्सर देखील या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आला आहे. (Timex Fit 2.0 Smartwatch Launched in India With Bluetooth Calling, 7-Day Battery Life)

Timex Fit 2.0 ची किंमत भारतात 5,995 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हे वॉच कंपनीने तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच केलं आहे. यात ब्लू, ग्रे आणि ब्लॅकचा समावेश आहे. ग्राहक हे नवं स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करु शकतात.

टाइमेक्सच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे. यासह, ब्लड ऑक्सिजन सेन्सर, स्लीप ट्रॅकर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकिंगचे फीचर देखील त्यात देण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगसाठी सात स्पोर्ट्स मोड्स देखील आहेत.

टाइमेक्स फिट 2.0 मध्ये 45 मिमी डायल आहे आणि उजव्या बाजूला नेव्हिगेशनसाठी एक बटण आहे. या स्मार्टवॉचमध्ये, वापरकर्त्यांना सात दिवसांची बॅटरी मिळेल. याशिवाय यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे.

वापरकर्त्यांना या स्मार्टवॉचमध्ये म्युझिक प्लेबॅक कंट्रोल आणि कॅमेरा कंट्रोलची सुविधाही मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टवॉचद्वारे कॉल देखील केले आणि रिसीव्ह केले जाऊ शकतात.

युजर्सना Timex Fit 2.0 मध्ये अनेक वॉच फेस देखील मिळतील. हे स्मार्टवॉच वॉटर, डस्ट आणि स्वेट रेसिस्टंट आहे. या स्मर्टवॉचला IP54 सर्टिफिकेशन मिळालं आहे.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Timex Fit 2.0 Smartwatch Launched in India With Bluetooth Calling, 7-Day Battery Life)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.