Poco C75 सह ‘हे’ टॉप 5 जी फोन मिळणार 10,000 पेक्षा कमी किंमतीत, जाणून घ्या फीचर्स

आता 5जी स्मार्टफोनच्या यादीत पोको सी 75 चे नावदेखील समाविष्ट झाले आहे. विशेष म्हणजे याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. पण तुम्हाला माहित आहे का या रेंजमध्ये आणखी कोणते बेस्ट 5जी फोन उपलब्ध आहेत?

Poco C75 सह  'हे' टॉप 5 जी फोन मिळणार 10,000 पेक्षा कमी किंमतीत, जाणून घ्या फीचर्स
news of mobile phone
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 3:03 PM

तुम्हाला देखील येणाऱ्या नवीन वर्षात नवीन 5जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तेही कमी बजेटमध्ये तर तुम्ही हे स्मार्टफोन खरेदी करू शकतात. कारण 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत टॉप 5जी फोन तुम्हाला खरेदी करता येतील. दरम्यान भारतीय बाजरपेठेत 4G फोनची मोठी रेंज असली तरी 5जी सेगमेंटमध्ये मर्यादित संख्येचेच फोन उपलब्ध आहेत. नुकतेच Poco C75 5जी आणि Moto G35 सारखे स्मार्टफोन्सचे बजेट फोनच्या या श्रेणीत लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया टॉप-5 बेस्ट 5जी फोन्सबद्दल

आपला भारतदेश हा आता ५जीकडे वाटचाल करत आहे. Poco C75 5जी फोनबाबत कंपनीचा दावा आहे की, हा देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन आहे. 5 जी तंत्रज्ञान आपल्याला चांगले इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली प्रदान करते .

10,000 पेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम 5 जी फोन

Poco C75 5G : हा स्मार्टफोन 7,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ चिपसेट देण्यात आला आहे. रिअर कॅमेरा ५० मेगापिक्सल, सपोर्ट कॅमेरा १.८ मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये सोनी लेन्स आहे. यात 18W फास्ट चार्जिंगसह 5160 mAHची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 4GB + 64GB मेमरी सेटअप देखील यासोबत येतो.

Moto G35 5G : Moto G35 5G हा स्मार्टफोन पोकोच्या फोनला टक्कर देण्याचे काम करतो, जो नुकताच लाँचही करण्यात आला आहे. यात 18W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात Unisoc T760 चिपसेट आहे. मेमरीच्या बाबतीत हा फोन4GB + 128GB सेटअपसोबत येतो. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे झाल्यास या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर मेन कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे.

Realme C61 :रिअलमी हा स्मार्टफोन कंपनीने 2024 मध्येच लाँच केला आहे. यात Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. टॉप व्हेरियंटमध्ये 6GB + 128GB मेमरी सेटअप आहे. यात 5000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपमध्ये ३२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर तुम्ही हा स्मार्टफोन ८,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

Lava Blaze2 5G : हा फोन १०,००० रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट ५जी स्मार्टफोनपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 6020 चिपसेट मिळेल. यात 5000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या मागच्या बाजूला ५० मेगापिक्सल + ०.८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप आहे. तर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याचा टॉप व्हेरियंट 6GB + 128GB सेटअपसह येतो. याची किंमत 9,999 रुपये इतकी आहे.

Redmi A4 5G : Redmi A4 5G हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनच्या रेंजमध्ये देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला Poco C75 5G सारखाच Snapdragon 4s Gen2 चिपसेट आहे. यात ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि रियरला १.८ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन 4GB रॅमसह 64GB आणि 128GB इंटरनल मेमरी ऑप्शनमध्ये येईल. यात 5,160 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 8,948 रुपयांपासून सुरू होते.

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....