Year Ender 2020 : 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेले टॉप 5 स्मार्टफोन्स

जबरदस्त फिचर्स, तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या आणि यावर्षी लाँच झालेल्या टॉप 5 स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत.

Year Ender 2020 : 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेले टॉप 5 स्मार्टफोन्स
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 4:34 PM

मुंबई : स्मार्टफोन कंपन्या भारतात कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असतात. परंतु फोनमधील बॅटरी हे एक असं कारण आहे, ज्यामुळे युजर्स अनेक जबरदस्त फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याचं टाळतात. जबरदस्त फिचर्स आणि मोठी बॅटरी या दोन गोष्टींचा समतोल राखण्यात अनेक कंपन्या मागे पडताना दिसतात. बॅटरीसोबत हल्ली मोबाईलचा कॅमेरादेखील खूप महत्त्वाचा आहे. हल्ली लोकांना प्रत्येक फोटो डीएसएलआर कॅमेराप्रमाणे हवा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा हवा, अशीही युजर्सकडून मागणी होत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जबरदस्त फिचर्स, तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या आणि यावर्षी लाँच झालेल्या टॉप 5 स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. (Top 5 smartphone of 2020 with 6000mAh battery and 48MP Camera)

वनप्लस नॉर्ड (Oneplus Nord)

25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला वनप्लस नॉर्ड हा या वर्षी लाँच झालेला सर्वात दमदार स्मार्टफोन मानला जातो. हा फोन 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंतच्या स्टोरेजसोबत येतो. वनप्लसचा हा स्वस्तातील स्मार्टफोन OxygenOS 10.5 पर बेस्ड अँड्रॉयड 10 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. वनप्लस 8 सीरिज प्रमाणे OnePlus Nord स्मार्टफोन मध्ये 5 जी सपोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम प्लस 64 स्टोरेज, 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या तिन्ही व्हेरियंट्सची किंमत अनुक्रमे 24 हजार 999 रुपये, 27 हजार 999 रुपये आणि 29 हजार 999 रुपये इतकी आहे.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स (Redmi Note 9 Pro Max)

Redmi Note 9 Pro Max या स्मार्टफोनची किंमत 19 हजार रुपये इतकी आहे. यामध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कोअर रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 5020 mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.67 इंचांचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

रियलमी नार्झो 20 प्रो (Realme Narzo 20 Pro)

Realme Narzo 20 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनध्ये दोन सिम व एक मायक्रो एसडी स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड 10 बेस्ड रियलमी यूआयवर काम करतो.

पोको X3 (Poco X3)

Poco X3 हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 ओएसवर काम करतो. या फोनमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बॅटरी. या फोनमध्ये 6000mAh क्षमतचे बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W का फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिवाईसमध्ये स्टीरियो स्पीकर्स आणि 120Hz चा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सला क्वाड कोर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वीवो वी 20 (Vivo V20)

Vivo V20 या स्मार्टफोनला 2020 मधील सर्वात बेस्ट सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन म्हटलं आहे. 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला या फोनपेक्षा चांगला सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन मिळणार नाही. या फोनमध्ये 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असे दोन पर्याय आहेत. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेन्ससही ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे.

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

Nokia लवकरच 4500mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणारे तीन नवे स्मार्टफोन लाँच करणार?

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

जगातला सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन 11 जानेवारीला लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Year Ender 2020 : Oneplus nord, Redmi note 9 Pro Max, Poco x3, Realme Narzo 20 Pro are best phones)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.