टोयोटा लवकरच मार्केटमध्ये आणणार नवी कार, मिळणार जबरदस्त मायलेज
टोयोटाने नवीन जनरेशन कॅमरीच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन कॅमरी सेडान ११ डिसेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे.
टोयोटाने नवीन जनरेशन कॅमरीच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन कॅमरी सेडान ११ डिसेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. टोयोटाने २०२३ वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात पदार्पण करणार आहे. या कार मध्ये अपडेटेड बाह्य आणि इंटिरियर, नवीन रंग, वैशिष्ट्ये, सुरक्षा आणि हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आली आहे.
नवीन डिझाईन
नवीन जनरेशनची टोयोटा कॅमरी हि कार तुम्हाला बाहेरून एकदम नवीन डिझाईन मध्ये दिसणार आहे. यात लो-स्लंग स्टँड आहे आणि त्यात तुम्हाला या गाडीच्या पुढील सीटच्या भागात जास्त जागा देण्यात आली आहे. तसेच या मध्ये शार्प कट आणि क्रीज लाइन्स, लोअर रूफलाइन व मोठी ग्रिल देण्यात आली आहे. यात नवीन सी-आकाराचे एलईडी डीआरएल आणि नवीन सी-आकाराचे टेललाइटसह पातळ एलईडी हेडलाइट्स लावण्यात आली आहेत. तुम्ही जर या कारच्या आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेरियंटनुसार कारच्या चाकांचा आकार १८ ते १९ इंच असून भारतीय मॉडेलमध्ये १९ इंचाची चाके दिली जाऊ शकतात. टोयोटाने नव्या जनरेशनच्या कॅमरीमध्ये ओशन जेम आणि हेवी मेटल असे दोन रंग या कारमध्ये दिले गेले आहेत.
केबिन
दरम्यान, नवीन कॅमरीच्या इंटिरियरमध्ये दोन डिजिटल स्क्रीनसह पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड लेआउटसह मोठा बदल पाहायला मिळणार आहे. याचे इन्स्ट्रुमेंटेशन ७ इंचाच्या स्क्रीनद्वारे दिले जाते. इन्फोटेनमेंट ड्युटी फ्लोटिंग 12.3 इंच टचस्क्रीन सेटअपद्वारे केली जाते. यात जेबीएल साउंड सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले, डिजिटल की आणि इतर काही टेक्नॉलॉजीशी संबंधित फीचर्स असण्याची शक्यता आहे.
वैशिष्ट्ये आणि सुरक्षा
आंतरराष्ट्रीय बाजारात नवव्या जनरेशनच्या कॅमरीमध्ये १० इंचाचा हेड-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, टेलिमॅटिक्स, कनेक्टेड कार टेक, ड्युअल झोन एसी आणि पॉवर्ड आणि मेमरी फंक्शनसह हवेशीर/गरम सीट देण्यात आल्या आहेत. यात ९ स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम, ५ यूएसबी पोर्ट (फ्रंट आणि रियर), वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की टोयोटा हे फीचर भारतीय मॉडेलमध्येही देऊ शकते. नवीन जनरेशन कॅमरीमध्ये अॅडव्हान्सड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) देण्यात आली आहे, ज्यात पेडरेशन डिटेक्शन, रिअर-क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, अॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन-कीपिंग असिस्ट सह टक्कर पूर्व प्रणाली देखील आहे.
हायब्रीड पॉवरट्रेन
नवीन कॅमरी सेडानमध्ये टोयोटाच्या जनरेशन ५ हायब्रीड सिस्टमसह अपडेटेड २.५-लीटरचे ४-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. या कारच्या नवीन बॅटरी, दोन नवीन इलेक्ट्रिक मोटर्स आणि नवीन कंपोनेंट मिळतील. ऑल-व्हील ड्राइव्ह व्हर्जनमध्ये २३२ पीएसचे कंबाइंड पॉवर आउटपुट असेल. टोयोटा कॅमरी नवीन मॉडेलच्या फ्रंट-व्हील-ड्राइव्ह व्हर्जनमध्ये २२५ पीएसपॉवर आउटपुट असणार आहे.
किंमत आणि कंपेरिझन
सध्याच्या टोयोटा कॅमरीची (एक्स शोरूम) किंमत ४६. १७ लाख रुपये आहे आणि नवीन कॅमरीची किंमत ५०लाख (एक्स-शोरूम )रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. तर या कारची स्पर्धा स्कोडा सुपर्बशी होणार आहे.