TRAI : नव्या वर्षात यूजर्सना येणार अच्छे दिन, कॉलिंग, SMS साठी मिळणार नवा रिचार्ज प्लान
भारतातील कोट्यावधी यूजर्स टेलिकॉम कंपन्यांकडे त्या सर्व्हिसचेही पैसे भरत होते, ज्या सेवांची त्यांना गरजच नाही. हीच बाब लक्षात घेता यूजर्ससाठी नवे प्लान्स आणण्याचे निर्देश आता ट्रायने टेलिकॉम कंपन्याना दिले आहेत. ट्रायचे नवे आदेश काय आहेत आणि त्याचा यूजर्सना कसा फायदा होईल, हे जाणून घेऊया.
या वर्षी जुलै महिन्यात रिचार्ज प्लान्स महागल्याने Jio, Airtel आणि Vi यूजर्स नाराज आहेत. मात्र नव्या वर्षात कोट्यवधी मोबाईल यूजर्सना स्वस्त रिचार्ज प्लान्सचे गिफ्ट मिळू शकतं. मोबाईला वापरणाऱ्या ग्राहकांना आता इंटरनेट डेटा न घेताही रीचार्ज करता येणार आहे. ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि एसएमएस(SMS) साठी प्लान्स द्या, असे आदेश टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने नुकताच सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदिले आहेत. त्यामुळे केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रायच्या या नव्या आदेशामुळे त्या लोकांना फायदा होऊ शकतो ज्यांच्याकडे 2 मोबाईल नंबर आहेत किंवा जे फीचर फोनचा वापर करतात. फीचर फोन वापरणारे बहुतांश ग्राहक हे कॉलिंग आणि एसएमएसचा वापर करतात. अशा लोकांचा डेटा खूप कमी वापरला जातो. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी यूजर्सना पुन्हा अच्छे दिन येऊ शकतात.
ट्रायचं प्लानिंग
जियो, एयरटेल, बीएसएनएल आणि व्होडाफोन या कंपन्याकडे यूजर्ससाठी डेटा प्लॅन आणि डेटा प्लस व्हॉइस प्लॅन उपलब्ध आहेत. पण असे बरेच लोक आहेत जे फोनचा वापर फक्त कॉल किंवा एसएमएससाठी करतात. अशा परिस्थितीत आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी फक्त व्हॉइस आणि एसएमएस पॅक जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. असं झालं तर तुम्ही वापरत असलेल्या सेवेसाठीच तुम्हाला पैसे द्यावे लागतील. सध्या अशी परिस्थिती आहे की ज्यांना फक्त एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा हवी आहे त्यांना डेटासाठीदेखील पैसे भरावे लागतात.
उदाहरणार्थ, सजियो, एयरटेल, व्हीआय किंवा बीएसएनएल चा 147 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देतो. परंतु तुम्हाला फक्त एसएमएस आणि कॉलिंग याच सुविधा हव्या असतील तर 147 रुपयांचा प्लान खरेदी करून तुम्ही टेलिकॉम कंपनीकडे असे पैसेही भरत आहात, ज्याची ( सुविधेची) तु्म्हाला गरजच नाही. मात्र ट्रायच्या या निर्देशानुसार आता टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी फक्त एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा असलेले नवे प्लान्स आणावे लागतील. त्यामुळे नव्या वर्षांत ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.