Twitter Down | भारतात ट्विटर डाऊन, पेज रिफ्रेश आणि पोस्ट करण्यास अडचण
सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर मागील 1 तासांपेक्षा अधिक काळ डाऊन आहे. आतापर्यंत 2,200 पेक्षा जास्त लोकांनी DownDetector वेबसाईटवर याबाबत तक्रार नोंदवली आहे.

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर मागील 1 तासांपेक्षा अधिक काळ डाऊन आहे. आतापर्यंत 2,200 पेक्षा जास्त लोकांनी DownDetector वेबसाईटवर याबाबत तक्रार नोंदवली आहे. DownDetector ने दिलेल्या रिपोर्टनुसार ट्विटरवर युजर्सला आपलं न्यूज फीड रिफ्रेश करण्यास अडचण येत आहे. ही अडचण ट्विटरच्या केवळ वेब व्हर्जनमध्येच नाही, तर iPhone आणि Android युजर्सलाही येत आहे. अनेक युजर्सला पोस्ट करण्यात देखील अडचण येत आहे (Twitter down in India Users Unable to Post or refresh News Feed).
काही तांत्रिक गुंतागुंतीमुळे (टेक्निकल ग्लिच) युजर्सला या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं बोललं जात आहे. ट्विटर लवकरच यावर उपाययोजन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. DownDetector च्या रिपोर्टनुसार ट्विटर चालत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी डेस्कटॉप युजर्सच्या आहेत. यानंतर अँड्रॉईड आणि आयओएस युजर्सच्या तक्रारी आहेत.
ही बातमी लिहिली जाऊपर्यंत ट्विटर डाऊनचा प्रश्न सुटला नव्हता. टीव्ही 9 मराठीच्या ट्विटरवर देखील पोस्ट करण्यात अडथळे येत आहेत. तसेच न्युज फीड देखील रिफ्रेश होत नाही. तुम्ही देखील याचा सामना करत असाल तर DownDetector.in वर याबाबत तक्रार करु शकता. ट्विटरने अजूनपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर ट्विटरकडून या प्रश्नाची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी युजर्स करत आहेत. ट्विटर आज (28 ऑक्टोबर) रात्री 7:40 मिनिटांनी डाऊन झाले.
संबंधित बातम्या :
Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, कोट्यावधी युजर्सला फटका
Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक
व्होडाफोन-आयडिया नेटवर्क डाऊन, नेमकं कारण अखेर समोर!
Twitter down in India Users Unable to Post or refresh News Feed