WhatsApp एका नंबरवरुन 2 डिव्हाईसमध्ये वापरा, ट्रिक्स जाणून घ्या

तुम्हाला WhatsApp एका नंबरवरून दोन फोनवर वापरायचे आहे का? यावर आम्ही एक ट्रिक्स आणली आहे. या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला एका नंबरवरुन दोन वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये WhatsApp वापरता येईल, याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

WhatsApp एका नंबरवरुन 2 डिव्हाईसमध्ये वापरा, ट्रिक्स जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 7:16 PM

WhatsApp वापरताय का? तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, आम्ही तुमच्यासाठी एक खास ट्रिक्स घेऊन आलो आहोत. तुम्ही एकाच नंबरवरुन दोन वेगवेगळ्या मोबाईलमध्ये WhatsApp वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर याविषयी जाणून घ्या.

तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खास आहे. या ट्रिक्सद्वारे तुम्ही वेगवेगळ्या फोनमध्ये एका नंबरवरून दोन WhatsApp अ‍ॅप्स चालवू शकाल. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. फक्त या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. तुम्ही एका नंबरवरून दोन WhatsApp वापरू शकता. जाणून घ्या ट्रिक्स.

WhatsApp युजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. त्यामुळे युजर्सना WhatsApp वापरणे देखील सोपे होते. हे तुम्हाला माहितच आहे. आपण अनेक डिव्हाइसमध्ये WhatsApp चालवू शकता, यासाठी WhatsApp वरच लिंक्ड डिव्हाईसचा पर्याय उपलब्ध आहे. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

WhatsApp च्या या लिंक्ड पर्यायाद्वारे तुम्ही एकाच नंबरवरून दोन WhatsApp अ‍ॅप चालवू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक फॉलो करावी लागेल. आता ही ट्रिक्स कोणती आहे, याविषयी खाली जाणून घ्या.

दोन स्मार्टफोनमध्ये एका WhatsApp चा वापर

तुमच्या फोनमध्ये तुमचं WhatsApp अकाऊंट प्रायमरी डिव्हाईसवर सेट आहे की नाही, हे तपासून घ्यावं लागेल. नसेल तर चालू करा. यानंतर आपल्या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर अ‍ॅप डाऊनलोड करा.

यानंतर फोन नंबर टाकण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. आता लिंक केलेल्या डिव्हाईसचा पर्याय निवडा आणि फोनमधील स्कॅनरचा वापर करून दुसऱ्या डिव्हाईसवरील QR कोड स्कॅन करा.

हे केल्यानंतर तुम्ही प्रायमरी डिव्हाईसमधून लॉग आऊट न करता दोन्ही डिव्हाईसवर एकाच वेळी WhatsApp वापरू शकता.

लक्षात ठेवा की तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन वापरत नाही, WhatsApp च्या नियम आणि अटींचे पालन करा, जर तुम्ही हे फॉलो केले नाही तर WhatsApp अकाऊंट देखील ब्लॉक होऊ शकते.

फीचरचा फायदा काय?

WhatsApp च्या फीचरच्या माध्यमातून तुम्ही एकाच फोन नंबरवरून WhatsApp आपल्या वेगवेगळ्या डिव्हाईसवर सिंक करू शकता. हे फीचर तुम्हाला डेस्कटॉपवर WhatsApp आणि अँड्रॉइड टॅब्लेटवर आणखी 4 डिव्हाईसवर कनेक्ट करण्याची परवानगी देते.

एकाच वेळी दोन स्मार्टफोनवर एकाच नंबरवरून WhatsApp वापरल्यास तुम्हाला वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये अकाऊंटमधून पुन्हा पुन्हा लॉग आऊट करावे लागणार नाही. WhatsApp चे लिंक्ड डिव्हाईस फीचर तुमच्या अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसमध्ये काम करते.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...