केवळ 75 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा, जाणून घ्या ऑफरबाबत
रिलायन्जिस ओ अगदी 11 रुपयांपासून ते 3499 रुपयांपर्यंतचे प्लॅन जिओ ऑफर करते, ज्यामध्ये तुम्हाला डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे मिळतात.
मुंबई : रिलायन्स जिओ(Reliance Jio) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान बाजारात आणते. अगदी 11 रुपयांपासून ते 3499 रुपयांपर्यंतचे प्लॅन जिओ ऑफर करते, ज्यामध्ये तुम्हाला डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 75 रुपयांपर्यंत आहे आणि त्यात तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा मिळेल. आज आम्ही तुम्हाला ज्या योजनांबद्दल सांगणार आहोत त्या जिओफोनसाठी आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा मिळेल. जिओफोनच्या या प्लॅनची किंमत 39 रुपयांपासून सुरू होते. (Unlimited calling, SMS and data on any network for just Rs 75 on Jio)
JioPhone 39 रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानची वैधता 14 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 100MB डेटा मिळेल म्हणजेच तुम्ही 14 दिवसात एकूण 1400MB डेटाचा लाभ घेऊ शकता. यासह, दैनंदिन डेटा संपल्यानंतर, आपण 64Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
JioPhone 69 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 0.5GB डेटा मिळेल, याचा अर्थ तुम्हाला या प्लानमध्ये एकूण 7GB डेटा मिळेल. यासह, दैनंदिन डेटा संपल्यानंतर, आपण 64Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सची मोफत सदस्यता मिळू शकते.
JioPhone 75 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला दररोज 0.1GB डेटा आणि 200MB अतिरिक्त डेटा मिळेल. दैनंदिन डेटा संपल्यानंतर तुम्ही 64kbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. यासह, तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 50 एसएमएसचा लाभ देखील मिळेल. या गोष्टींशिवाय, या प्लानमध्ये तुम्हाला JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारखे Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. (Unlimited calling, SMS and data on any network for just Rs 75 on Jio)
तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाणhttps://t.co/iMTXwDJbe8#Crime #Transgender #Nagpur #NagpurCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2021
इतर बातम्या
तुमचे आयुष्य कमी करतील, या पाच सवयी सोडा ; उत्तम आरोग्यासाठी सविस्तर जाणून घ्या