मुंबईकरांना रेल्वे तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, Mobile Ticketing App सुरु
लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊन मुंबई लोकलने दररोज प्रवास करणारे प्रवाशी आता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने तिकीट बुक करू शकतील.
मुंबई : लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊन मुंबई लोकलने दररोज प्रवास करणारे प्रवाशी आता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने तिकीट बुक करू शकतील. मध्य रेल्वेने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या मदतीने त्यांच्या स्मार्टफोनवर ट्रेनचे तिकीट बुक करू शकतात. (Vaccinated passengers allowed to book Mumbai local train tickets on UTS mobile ticketing app)
याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वेने यूटीएस मोबाईल अॅपला (UTS App) महाराष्ट्र शासनाच्या ‘युनिव्हर्सल पास’शी जोडले आहे, ज्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या स्थानिक प्रवाशांना त्यांच्या फोनवर तिकीट बुक करता येईल. दोन्ही लिंकिंगमुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय तिकीट काढता येणार आहे.
लाहोटी यांनी सांगितले की, “ज्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस झाले आहेत आणि ज्याला मुंबई लोकलने प्रवास करायचा आहे त्याला राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास घ्यावा लागेल. लसीबाबत माहिती घेतल्यानंतर हा पास जारी केला जातो. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो.”
दरम्यान, आता युनिव्हर्सल पास जारी करणाऱ्या राज्य सरकारचे पोर्टल रेल्वे यूटीएस मोबाइल अॅपशी (Railway UTS Mobile APP) जोडण्यात आले आहे. याद्वारे प्रवासी काउंटरवर न जाता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने सहज तिकीट बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये UTS अॅप इन्स्टॉल करावे लागेल. रेल्वे काउंटरवरील गर्दी कमी करणे हा या सुविधेचा मुख्य उद्देश आहे. या अॅपच्या मदतीने दैनंदिन तिकीट आणि मासिक पास दोन्ही जारी केले जातील. 24 नोव्हेंबरपासून प्रवाशांना ही सुविधा मिळण्यास सुरुवात होणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.
ज्या प्रवाशांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आधीपासूनच उपलब्ध आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी फक्त त्यांचे अॅप अपडेट करावे लागेल. कारण, कोरोनाच्या काळात रेल्वेने UTS मोबाईल अॅप सस्पेंड केले होते.
UTS app for Android is already available & iOS app will be available by tonight. So this facility of UTS app for local train passes can be used from tomorrow morning: Anil Kumar Lohati, General Manager, Central Railway
— ANI (@ANI) November 23, 2021
इतर बातम्या
‘आधी झोपेतून जागे व्हा’, चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा टोला
मुंबईत 21 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या, 36 वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक
(Vaccinated passengers allowed to book Mumbai local train tickets on UTS mobile ticketing app)