ट्विटरकडून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरु, जाणून घ्या ब्लू टिक कशी मिळवता येईल?
मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) त्यांची अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची माहिती दिली.
मुंबई : मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) त्यांची अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची माहिती दिली. टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने म्हटले आहे की, ज्या वापरकर्त्यांना व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यांना अॅप्लिकेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या अकाऊंट सेटिंग्ज वारंवार तपासाव्या लागतील. (verification process Restarts from Twitter, find out how to get Blue Tick?)
व्हेरिफिकेशनची प्रक्रिया नव्याने सुरू केल्यापासून, ट्विटरला काही त्रुटी आढळल्या, ज्यामुळे त्यांना व्हेरिफिकेशन प्रोसेस बंद करावी लागली. त्यानंतर कंपनीने अर्ज आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया दोन्ही सुधारण्याची गरज असल्याचे सांगितले.
अहवालात म्हटले आहे की, मायक्रो-ब्लॉगिंग साइट वर्षानुवर्षे खाते पडताळणीसाठी संघर्ष करत आहे. प्रत्येकाला असे वाटते की ब्लू टिक जी आधी सेलिब्रिटीज आणि इतर मोठ्या लोकांच्या खात्यांसाठी दिली गेली होती ती आता सामान्य वापरकर्त्यांनाही दिली गेली पाहिजे. यात सरकारी अधिकारी, पत्रकार, सेलेब्स, ब्रँड किंवा व्यवसायांचे ट्विटर हँडल्स यांचा समावेश आहे.
व्हेरिफिकेशन प्रोसेसदरम्यान ट्विटरकडून अनेकदा चुकादेखील झाल्या आहेत. ट्विटरने जेसन केलरचे अकाऊंट व्हेरिफाय करुन त्याला ब्लू टिक दिली होती. मात्र याच जेसनने व्हर्जिनियाच्या शार्लोट्सविले येथे घातक श्वेत वर्चस्ववादी रॅलीचे आयोजन केले होते. त्यानंतर थोड्याच वेळात, ट्विटरने अधिकृतपणे व्हेरिफिकेशन थांबवले, मात्र सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर, निवडून आलेले उमेदवार, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि इतरांसह काही खास व्यक्तींसाठी शांतपणे व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू ठेवली होती.
दरम्यान, कंपनीने नवीन नियम जारी केले आहेत, जे अधिक स्पष्टपणे सांगतात की कोणकोणत्या व्यक्ती या व्हेरिफिकेशनसाठी विनंती करू शकतात आणि कोण करू शकत नाही. व्हेरिफिकेशनची मागणी इतकी मोठी होती की ट्विटर लाँच झाल्यानंतर आठ दिवसांनी त्यांना ही प्रक्रिया थांबवावी लागली.
चं ब्लू टिकवालं अकाऊंट हवंय? वाचा ‘या’ सोप्या टीप्स…
ट्विटरने या प्रक्रियेला 6 कॅटेगरीत विभागलंय. यात सरकार, कंपनी, ब्रँड आणि संघटना, वृत्तसंस्था आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मनोरंजन, खेळ आणि गेमिंग आणि अन्य प्रभावी व्यक्तींचा समावेश असेल. ब्लू टिक मिळवण्यासाठी तुमचं अकाऊंट मागील 6 महिन्यांपासून अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. अकाउंटचे नियमाप्रमाणे फॉलोवर्स असावेत. मागील 12 तास ते 1 आठवड्याच्या काळात तुम्ही कोणताही ट्विटर नियम तोडलेला नसावा. अकाउंटमध्ये प्रोफाइल फोटो, सरकारी आयडी आणि ईमेल आयडी असावा.
ट्विटरवर सर्वांना नवं व्हेरिफिकेशन अॅप्लिकेशन थेट अकाउंट सेटिंग टॅबमध्ये दिसण्यास सुरुवात होईल. यानंतर संबंधित यूजर्सला ब्लू टिकसाठी अर्ज करत आपली माहिती द्यावी लागेल. तुमची सर्व माहिती योग्य असेल तर ट्विटर तुमच्या अर्जाला गृहित धरुन तुम्हाला ब्लू टिक देईल. जर अर्ज करुनही तुम्हाला ब्लू टिक मिळाली नाही तर तुम्ही 30 दिवसांच्या आत यासाठी पुन्हा अर्ज करु शकता.
इतर बातम्या
ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात
डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच
सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही
(verification process Restarts from Twitter, find out how to get Blue Tick?)