8 GB रॅमसह Vivo S1 Pro लाँच, पाहा किंमत आणि फीचर
विवोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन ‘S1 Pro’ लाँच (Vivo s1 pro launch india) केला आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसोबत उपलब्ध आहे.
मुंबई : विवोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन ‘S1 Pro’ लाँच (Vivo s1 pro launch india) केला आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोअरेज दिले आहे. या स्मार्टफोनची किंमत 19 हजार 990 रुपये आहे. हा फोन आजपासून (4 जानेवारी) सर्वत्र ऑनलाई आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध झाला आहे.
हा स्मार्टफोन विवो इंडिया ई-स्टोअर आणि अमेझॉन, फ्लिपकार्टसह सर्व प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट्सवर आणि ऑफलाईन स्टोअरवर उपलब्ध आजपासून उपलब्ध झाला आहे. नवीन Vivo S1 Pro मिस्टिक ब्लॅक, जॅजी ब्लू आणि ड्रीमी व्हाईट रंगात मिळेल. एस सीरिजमध्ये हा दुसरा फोन आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रिअर डायमंड शेप (Vivo s1 pro launch india) क्वॉड कॅमेरा सेटअप आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी नवीन S1 Pro मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगा पिक्सल सेकेंडरी कॅमेरा, त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन (EIS) चा सपोर्टही दिला आहे.
डिस्प्ले
फोनमध्ये 6.38 इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर अँड्रॉईड 9 पाय पेस Funtouch OS 9.2 ड्युअल सिम बॅटरी 4,500mAh
ऑफर्स
Vivo S1 Pro खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. ऑफलाईन स्टोअरमध्ये ICICI बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केला तर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय जिओकडून 12 हजार रुपयांची ऑफर मिळत आहे. तसेच फोनसह वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा मिळत आहे. ऑनलाईन स्टोअरवरही वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा दिली जात आहे. ज्याची वैधता 31 जानेवारी 2020 आहे.