12GB/256GB, डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
व्हिवो (Vivo) कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन ‘Vivo S9 5G’ आज (3 मार्च) दुपारी लाँच करणार आहे. ((Vivo S9 5G smartphone launching today)
मुंबई : व्हिवो (Vivo) कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन ‘Vivo S9 5G’ आज (3 मार्च) दुपारी लाँच करणार आहे. एका नवीन प्रोमो व्हिडीओद्वारे कंपनीने याची पुष्टी केली आहे. हा स्मार्टफोन ‘डायमेंशन 1100 चिपसेट’ आणि यूएफएस 3.1 स्टोरेजद्वारे संचालित असेल. या डिव्हाइसमध्ये 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल आणि हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉयड 11 ओएस वर चालेल. (Vivo S9 5G smartphone launching today with dual selfie camera feature)
Vivo S9 ची डिझाईन Vivo S7 प्रमाणेच असेल. यात 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देखील असेल. Vivo S9 मध्ये 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा देखील असेल. हा फोन काळ्या, पांढर्या आणि गडद निळ्या रंगात उपलब्ध असेल. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह आयताकृती कॅमेरा सेटअप असेल. डिव्हाइसच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवरदेखील असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Vivo S9 सोबतच Vivo S9 सिरीजमधील इतर स्मार्टफोनही बाजारात आणले जातील.
Vivo S9 मध्ये 44 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल तर Vivo S9 E मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. फोनला 4000 mAh क्षमतेची बॅटरी मिळेल जी 33 वॅट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानास सपोर्ट करेल.
विवोने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन विवो वाय 51 ए (Vivo Y51A) भारतात लाँच केल्यामुळे वाय सिरिज पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली होती. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे, जी 1 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या डिव्हाइसची किंमत 17,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन टायटॅनियम सफायर आणि क्रिस्टल सिम्फनी या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो.
Vivo Y51A मध्ये काय आहे खास?
या स्मार्टफोनमध्ये 16.71 सेमी (6.58 इंचाचा) हॅलो फुलव्यू डिस्प्ले आहे, जो फुल एचडी प्लस (2408 x 1080 पिक्सल) रिझोल्यूशनने सज्ज आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ आणि गेम्स दोन्हीसाठी एक उत्कृष्ट अनुभव मिळेल. हे डिव्हाइस अत्याधुनिक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6-सिरिज प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 च्या धर्तीवर नवीन फनटच ओएस 11 सह सादर करण्यात आला आहे. Vivo Y51A मध्ये 48 एमपीचा रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायजेशन (ईआयएस) तंत्रज्ञानासह अल्ट्रा-स्टेबल व्हिडिओ प्रदान करतो. अनस्टेबल हालचाली मुमेंट्स दुरुस्त करण्यास हा स्मार्टफोन सक्षम आहे.
इतर बातम्या
6000 mAh बॅटरी, डुअल कॅमेरा, 6999 किंमतीसह नवा स्मार्टफोन बाजारात
256GB स्टोरेज, डुअल सेल्फीसह 108MP कॅमेरा, Motorola दमदार स्मार्टफोन लाँच करणार
तब्बल 16GB रॅमसह Lenovo नवा स्मार्टफोन लाँच करणार, गेमर्सना दमदार फीचर्स मिळणार
(Vivo S9 5G smartphone launching today with dual selfie camera feature)