अवघ्या 14990 रुपये किंमतीत Vivo चा 5G फोन लाँच, जाणून 5 महत्त्वाचे फीचर्स
व्हिवो (Vivo) या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo T1 5G असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारा सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मुंबई : व्हिवो (Vivo) या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. व्हिवो टी1 5जी (Vivo T1 5G) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारा सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फ्लिपकार्टवर या फोनची सुरुवातीची किंमत 14,990 रुपये इतकी आहे. या मोबाईलचा सेल 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा (Triple camera) सेटअप उपलब्ध असेल. हा फोन तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Vivo T1 5G च्या तीन व्हेरिएंटपैकी बेस व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज स्पेस मिळेल. तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 15,990 रुपये आहे आणि त्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळेल. तिसऱ्या व्हेरिएंटची किंमत 18990 रुपये आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. स्मार्टफोन अधिक गरम होऊ नये यासाठी लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
बाजरात या फोनला Moto G71 5G, Samsung Galaxy F42 5G, Realme 8 5G, OPPO A53s 5G या स्मार्टफोनशी स्पर्धा करावी लागेल. Moto G71 5G हा स्मार्टफोन 18999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. या मोबाईलमध्ये 6.4 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळतो.
Vivo T1 5G चे फीचर्स
- या Vivo स्मार्टफोनच्या तिन्ही व्हेरिएंटच्या किंमती 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. याच्या टॉप व्हेरियंटमध्ये 8 जीबी रॅम उपलब्ध आहे. Vivo T1 5G 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारा सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
- Vivo चा हा मोबाईल Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेससहसह येतो. यामध्ये हाय परफॉर्मन्ससाठी 2.2 GHz ऑक्टा कोअर वापरण्यात आला असून तो कमी पॉवर वापरतो.
- Vivo T1 5G मध्ये 120hz रिफ्रेश रेट मिळेल. त्याचा सॅम्पलिंग रेट 240hz आहे. हा फोन गेमिंग एक्सपीरियन्स सुधारेल. यात 6.67 इंच फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे.
- यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी चार दिवस चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. वास्तविक, यात 4 दिवसांचा प्ले म्युझिक बॅकअप आणि 19 तासांचा YouTube बॅकअप मिळतो. यात 18W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
- Vivo T1 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. यासोबतच इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल्सचे आहेत.
इतर बातम्या
IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?
IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?