मुंबई : विवो टी1एक्स (Vivo T1x) हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह वॉटरड्रॉप स्टाईल नॉच डिसप्ले देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये यूजर 8GB पर्यंत रॅम वाढवू शकणार असून यासह अनेक खास फीचर्स (Features) देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होणार असून तो 27 जुलैपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. स्मार्टफोनच्या व्हेरिएंटनुसार, त्याची किंमत (Price) बदलणार आहे. या लेखातून या नवीन फोनबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत.
Vivo T1x च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर दुसरीकडे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लू कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. 27 जुलैपासून हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, एचडीएफसी बँक कार्डवर 1,000 रुपयांची सूट आणि Flipkart Axis बँक कार्डद्वारे 5 टक्के कॅशबॅक दिले जाईल.
फोनमध्ये Android 12 देण्यात आले आहे. यात 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2408 पिक्सेल) एलसीडी डिसप्ले आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट आहे. त्याची स्क्रीन टू बॉडी रेशो 90.6 टक्के आहे. हा फोन ऑक्टा कोर 6nm क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 6GB पर्यंत LPDDR4x रॅम असून ती 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते. विवोने स्मूथ गेमिंगसाठी नवीन डिव्हाईसमध्ये 4 लेयर कूलिंग सिस्टम दिली आहे.
फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 लेंससह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेंसर आणि f/2.4 लेंससह 2 मेगापिक्सेल दुय्यम सेंसर आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये f/1.8 लेंससह 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. फोनमध्ये 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS, GLONASS, OTG, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी रिव्हर्स चार्जिंग फीचरलाही सपोर्ट करते.
परफॉर्मन्स – मीडियाटेक डायमेन्सिटी 900 MT6877
डिसप्ले – 6.58 इंच (16.71 सेमी)
स्टोरेज – 128 जीबी
कॅमेरा – 64 MP + 2 MP
बॅटरी – 5000 mAh
रॅम – 6 जीबी