भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी ब्रँड्स वरचढ, तब्बल 72 टक्के वाटा

भारतीय स्मार्टफोन बाजारात चिनी ब्रँड्सचा 72 टक्के वाटा आहे, असं रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालात म्हटलं आहे. अहवालानुसार, चिनी स्मार्टफोन उत्पादकांनी बाजारपेठेत वर्चस्व राखले आहे. त्यानुसार विवो 15.8 टक्के मार्केट शेअरसह पहिल्या क्रमांकावर असून ओप्पो 13.9 शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी ब्रँड्स वरचढ, तब्बल 72 टक्के वाटा
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 3:39 PM

भारतीय स्मार्टफोन बाजारात चिनी स्मार्टफोन उत्पादकांनी वर्चस्व राखले आहे. त्यानुसार विवो 15.8 टक्के मार्केट शेअरसह पहिल्या क्रमांकावर असून ओप्पो 13.9 टक्के शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. संबंधित तिमाहीत 12.3 टक्के मार्केट शेअरसह सॅमसंग पहिल्या 5 मध्ये एकमेव बिगर-चिनी कंपनी राहिली, असं रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालात म्हटलं आहे.

आर्थिक वर्ष 2025 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतातील स्मार्टफोन शिपमेंट 6 टक्क्यांनी वाढून 4.6 कोटींवर पोहोचली आहे, असे रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, चिनी स्मार्टफोन उत्पादकांनी बाजारपेठेत वर्चस्व राखले असून आघाडीच्या ब्रँड्सने या तिमाहीत सुमारे 72 टक्के मार्केट शेअर्स मिळविला आहे.

5G स्मार्टफोन शिपमेंटचा वाटा 83 टक्क्यांवर पोहोचला

रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 5G स्मार्टफोन शिपमेंटचा वाटा 83 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 57 टक्के होता. तथापि, 5G स्मार्टफोनची सरासरी विक्री किंमत (एएसपी) वार्षिक 20 टक्क्यांनी घटून 292 डॉलर झाली आहे.

गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यात 19.7 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. 2023 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत दक्षिण कोरियाच्या टेक कंपनीचा बाजारातील हिस्सा 16.2 टक्के होता.

‘ओप्पो’ला सर्वाधिक फायदा

‘ओप्पो’ला सर्वाधिक फायदा झाला, तर सॅमसंग आणि विवोचा वाटा घसरला असून, या सेगमेंटमध्ये या तिघांचा मिळून वाटा 53 टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.

अ‍ॅपलची 58.5 टक्के वार्षिक वाढ

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) 2024 च्या तिसऱ्या तिमाहीतील वर्ल्डवाइड तिमाही मोबाईल फोन ट्रॅकरनुसार, अ‍ॅपलने आतापर्यंतची सर्वात मजबूत तिमाही नोंदवली आणि 8.6 टक्के मार्केट शेअरसाठी 4 दशलक्ष युनिट्सची विक्री केली, जी 58.5 टक्के वार्षिक वाढ आहे. आयफोन 15 आणि आयफोन 13 च्या नेतृत्वाखाली अॅपलने 4 दशलक्ष युनिट्ससह सर्वात मोठी शिपमेंट केली आहे. यामुळे अ‍ॅपल आणि सॅमसंगच्या व्हॅल्यू शेअरमधील तफावत आणखी वाढली. ही तफावत अनुक्रमे 28.7 टक्के आणि 15.2 टक्के होती, असे अहवालात म्हटले आहे.

इतर मोबाईल कंपन्यांची आकडेवारी

या तिमाहीत एकूण स्मार्टफोन पुरवठ्यात ओप्पोचा वाटा 13.9 टक्के, रियलमीचा 11.5 टक्के, शाओमीचा 11.4 टक्के, पोकोचा 5.8 टक्के, मोटोरोलाचा 5.7 टक्के, iQOO चा 4.2 टक्के आणि वनप्लसचा 3.6 टक्के होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.