Vivo चा भारतीय बाजारात स्मार्टफोन लाँचिंगचा धडाका, किंमती आणि फीचर्स लीक
Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात. दरम्यान, या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती लीक झाल्या आहेत.
मुंबई : Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात. दरम्यान, या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती लीक झाल्या आहेत. Vivo V21 हा फोन एप्रिल महिन्यात लाँच झाला होता. त्यामुळे Vivo V21 Pro ही त्याची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. मार्च महिन्यात व्हिवो वाय 72 5 जी थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या दोन फोन्सच्या किंमतींबद्दल काही माहिती लीक झाली आहे. त्यानुसार व्हिवो व्ही 21 प्रो ची किंमत 33,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर व्हिवो वाय 72 5 जीची किंमत 23,000 रुपयांपेक्षा कमी असेल. (Vivo V21 Pro, Vivo Y72 5G Price and features leaked, launching soon in India)
91 मोबाइल्सच्या अहवालानुसार, Vivo V21 Pro ची किंमत 32,990 रुपये इतकी असेल ज्यामध्ये आपल्याला बेस मॉडेल मिळेल. दुसरीकडे, व्हॅनिला व्हिवो व्ही 21 5 जी भारतात 29,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल, ज्यामध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल्स मिळतील. Vivo Y72 5G ची किंमत 22,990 रुपये इतकी असेल, ज्यामध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल्स मिळतील. थायलंडमध्ये हे फोन 23,330 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते.
आधीच्या लीक्सनुसार Vivo V21 Pro या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो, तर Vivo Y72 5G 15 जुलै रोजी लाँच केला जाईल. फोन दोन रंगांमध्ये सादर केला जाईल. ज्यात ड्रीम ग्लो आणि ग्रेफाइट ब्लॅक कलरचा समावेश आहे. Vivo Y72 5G मध्ये 5G सपोर्ट, 8 जीबी रॅम आणि 4 जीबी व्हर्च्युअल रॅम, फुल एचडी स्क्रीन आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. त्याच वेळी, फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाणार आहे.
Vivo Y72 5G चे फीचर्स
Vivo Y72 5G मध्ये 6.58 इंचाचा FHD+ LCD IPS डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 1080 × 2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. या फोनच्या इंडियन व्हेरिएंटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. चिपसेट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह देण्यात येईल. हा हँडसेट फनटच ओएस 11.1 आधारित अँड्रॉइड 11 वर काम करेल.
फोनचं ग्लोबल व्हर्जन ट्रिपल रियर कॅमेर्यासह येतं. हेच व्हर्जन भारतात लाँच केलं जाऊ शकतं. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जो 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येईल. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाणार आहे. त्याचबरोबर फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची असेल, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
इतर बातम्या
Amazon Smartphone Sale : OnePlus, Xiaomi, Oppo च्या स्मार्टफोन्सवर 7000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
Smartphone Upgrade Days sale : 9000 रुपयांच्या डिस्काऊंटसह iPhone 12 खरेदीची संधी
(Vivo V21 Pro, Vivo Y72 5G Price and features leaked, launching soon in India)