64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Vivo V23e असे आहे. Vivo V23 सिरीजमधील हा पहिला फोन आहे. या मोबाईल फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
मुंबई : Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याचे नाव Vivo V23e असे आहे. Vivo V23 सिरीजमधील हा पहिला फोन आहे. या मोबाईल फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी याच्या फ्रंटला 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात इतरही अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच यामध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर आणि फास्ट चार्जर देण्यात आला आहे. (Vivo V23e launched with 64MP triple rear camera and 50 MP selfie camera)
Vivo V23e च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.44 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. जो 60hz च्या रीफ्रेश रेटसह येतो.
स्पेक्स आणि बॅटरी
या Vivo स्मार्टफोनमध्ये कंपनीने Helio G96 चिपसेट वापरला आहे, जो यूजर्सना चांगला स्पीड देईल. तसेच, या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. कंपनीने यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सिस्टम दिली आहे, सोबत 4050mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यात टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे.
हा Vivo स्मार्टफोन Android 11 आधारित Funtouch OS 12 वर काम करतो, ज्यामुळे यूजर्सला अनेक चांगले फीचर्स देखील मिळतात. तसेच या स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो.
शानदार कॅमेरा
Vivo V23e मध्ये नॉच कटआउट आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंग म्हणून देखील काम करतो. तसेच, या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. सोबत एक 8 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जो 115 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू कॅप्चर करू शकतो. यातील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे.
किंमत आणि उपलब्धता
हा Vivo स्मार्टफोन नुकताच व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला आहे आणि त्याची किंमत VND 8,490,000 (जवळपास 27,761 रुपये) आहे. हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरियंटमध्ये येतो, ज्यामध्ये मूनलाईट शॅडो आणि मेलोडी डॉन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन लवकरच भारतासह इतर देशांमध्ये लॉन्च होणार आहे.
इतर बातम्या
सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक
नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण
Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी
(Vivo V23e launched with 64MP triple rear camera and 50 MP selfie camera)