Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दमदार VIVO V23E चे फिचर्स लिक, 33 हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन आहे तरी कसा?

VIVO V23E मध्ये 50-मेगापिक्सेल सेल्फी स्नॅपर असेल. व्हिडिओमध्ये हे देखील दिसून आले आहे की हँडसेट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज प्रकारात येईल.

दमदार VIVO V23E चे फिचर्स लिक, 33 हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन आहे तरी कसा?
vivo
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 12:18 PM

मुंबई : Vivo लवकरच त्याचा नवीन V-सीरीज स्मार्टफोन V23E लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या हँडसेटचा एक अनबॉक्सिंग व्हिडिओ देखील लीक झाला आहे. ज्यात या फोनचे सारे फिचर्स उघड झाले आहेत. या व्हिडिओनुसार, स्मार्टफोन वॉटर ड्रॉप नॉच डिझाइन आणि ग्लास बॅक पॅनेलसह येईल बाजारामध्ये येईल.

काय आहेत त्यांचे फिचर्स

VIVO V23E मध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक शूटर, 8-मेगापिक्सेल दुय्यम लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा मॉड्यूल असेल. समोर, यात 50-मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर असेल. व्हिडिओमध्ये हे देखील दिसून आले आहे की हँडसेट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज प्रकारात येईल. मागील बाजूस, हँडसेटमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. डिव्हाइसमध्ये एक मायक्रोफोन देण्यात आला आहे, तर एक सिम स्लॉट, एक मायक्रोफोन, एक USB टाइप-सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये 6.52-इंच फुल-एचडी+ (1080×2460 पिक्सेल) OLED स्क्रीन 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह आणि 412 ppi च्या पिक्सेल घनतेसह अपेक्षित आहे. हे Android 11-आधारित Funtouch OS 12 वर चालेल आणि 44W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 4,030mAh बॅटरी पॅक असेल.

काय असेल फोनची किंमत? कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेट वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि टाइप-सी पोर्टला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. लीक नुसार, Vivo V23E स्मार्टफोन VND 10 मिलियन (अंदाजे रु. 32,900) च्या किंमतीसह येईल. असे म्हटले जात आहे की हे उपकरण सिंगल ब्लू कलर ऑप्शनमध्ये येईल.

VIVO ने दिवाळीच्या निमित्ताने खास ऑफर आणली आहे दिवाळीच्या निमित्ताने, विविध स्मार्टफोन निर्माते जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर विशेष विक्री आणि सूट देतात. दरम्यान, VIVO ने आपल्या स्मार्टफोन्सच्या रेंजवर खास ऑफर आणल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने Vivo X70 मालिका, V21 मालिका, Y73 आणि Y33s वर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. सणाच्या ऑफर ७ नोव्हेंबरपर्यंत वैध आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या VIVO X70 मालिकेमध्ये मेनलाइन चॅनेलवर उत्तम ऑफर पाहायला मिळतील. सणाच्या ऑफर दरम्यान, VIVO अनेक ऑफर करत आहे, ज्यापैकी एक तुम्हाला तुमचे बजाज फायनान्स कार्ड वापरून VIVO X70 मालिका, VIVO V21, VIVO Y73 आणि VIVO V21E रु.101 मध्ये मिळवू देते.

इतर बातम्या :

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.