AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50MP सेल्फी कॅमेरा आणि AI फीचर्ससह Vivo V50e लाँच, प्रोसेसर आणि बॅटरी किती ?

Vivo ने मध्यम रेंजमध्ये ग्राहकांसाठी Vivo V50e हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, जो उत्तम पोर्ट्रेट शॉट्स कॅप्चर करतो. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत? चला यासर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

50MP सेल्फी कॅमेरा आणि AI फीचर्ससह Vivo V50e लाँच, प्रोसेसर आणि बॅटरी किती ?
Vivo MobileImage Credit source: Vivo
Follow us
| Updated on: Apr 17, 2025 | 7:40 PM

भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन प्रेमीसाठी विवो कंपनीने त्यांचा नवीन फोन लॉंच केला आहे. तर विवो कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन मध्यम रेंजचा Vivo V50e 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. जो प्रत्येक मध्यम वर्गीय खरेदी करू शकतात. तर उत्तम डिझाइनसह लाँच केलेल्या या Vivo स्मार्टफोनच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये तुम्हाला AI फिचर्स तसेच चांगला व्ह्यूइंग अनुभवासाठी क्वाड कर्व्ड डिस्प्ले, व उत्तम दर्जांचा प्रोफेशनल पोर्ट्रेट शॉट्स आणि मित्रांसोबत सेल्फीसाठी एक उत्तम फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आलेला आहे.

हा फोन IP68 आणि IP69 म्हणजेच डस्ट एंड वॉटर रेसिस्टेंस फीचर्स, सर्कल टू सर्च सारख्या AIफिचर्ससह लाँच करण्यात आला आहे. या नवीन Vivo फोनची किंमत किती आहे, विक्री कधी सुरू होईल, फोनसोबत कोणत्या ऑफर्स उपलब्ध असतील आणि या डिव्हाइसमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत ते आपण जाणून घेऊयात…

Vivo V50e चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा फुल एचडी प्लस क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट, 300हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह येतो. तर तुम्हाला हा फोन HDR 10 Plus सपोर्टसह खरेदी करता येणार आहे.

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर देण्यात आलेला आहे.

कॅमेरा सेटअप:  या फोनमध्ये तुम्हाला फ्रंट आणि रियर कॅमेऱ्यातून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळेल. तसेच 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे आणि कॅमेरा अॅपमध्ये फिल्म कॅमेरा मोड देखील देण्यात आलेला आहे. फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 प्रायमरी कॅमेरा आहे, तसेच 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर आहे.

बॅटरी क्षमता:  विवोच्या फोनला 5600 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90 W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo V50e 5G ची भारतातील किंमत

या नवीनतम Vivo फोनच्या 8GB RAM / 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे परंतु जर तुम्ही या हँडसेटचा 8GB RAM / 256GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट घेतला तर तुम्हाला 30,999 रुपये मोजावे लागतील. सेलबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 17 एप्रिलपासून कंपनीच्या अधिकृत साइट तसेच Amazon आणि Flipkart वर सुरू होईल.

हा स्मार्टफोन या फोनला देणार टक्कर

विवोच्या या प्राईस रेंजमध्ये Vivo V50E ची स्पर्धा रियलमी 14 प्रो प्लस 5जी स्मार्टफोन, नथिंग फोन 3ए प्रो आणि मोटोरोला एज 50 प्रो सारख्या स्मार्टफोनशी होईल. Realme फोनच्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे, तर Nothing फोनच्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमतही 29,999 रुपये आहे. तुम्हाला मोटोरोला फोनचा 12 जीबी / 256 जीबी व्हेरिएंट 29,999 रुपयांना मिळेल.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...