Vivo कडून X Note, Vivo Pad सह पहिला फोल्डेबल फोन लॉन्च, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
व्हिवो एक्स फोल्ड (Vivo X Fold) हा स्मार्टफोन लॉन्च करून व्हिवो (Vivo) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. Vivo च्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 3 5जी (Galaxy Z Fold 3 5G) सारखीच फोल्डिंग यंत्रणा वापरण्यात आली आहे.
मुंबई : व्हिवो एक्स फोल्ड (Vivo X Fold) हा स्मार्टफोन लॉन्च करून व्हिवो (Vivo) या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. Vivo च्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 3 5जी (Galaxy Z Fold 3 5G) सारखीच फोल्डिंग यंत्रणा वापरण्यात आली आहे. Vivo Fold स्मार्टफोन सोबत कंपनीने Vivo X Note देखील लॉन्च केला आहे. हे डिव्हाईस म्हणजे 7-इंच डिस्प्लेसह एक प्रीमियम Android स्मार्टफोन आहे. यात टॉप-ऑफ-द-लाइन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसरदेखील आहे. Vivo Pad हा चीनमधील Vivo इव्हेंटमध्ये लाँच केलेला तिसरा स्मार्टफोन आहे. हे डिव्हाईस म्हणजे कंपनीचा नवीन टॅबलेट आहे जो 11 इंचाच्या 2.5K डिस्प्लेसह येतो. Vivo ने X Fold हा चीनमध्ये नवीन प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
यासोबतच कंपनीने X Note आणि Vivo Pad देखील लॉन्च केले आहेत. X Fold दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. याच्या बेस मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज आहे. त्याची किंमत CNY 8,999 (जवळपास 1,07,200 रुपये) आहे. 12GB + 512GB स्टोरेज पर्याय असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 9,999 (जवळपास 1,19,100) रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रे रंगात येतो.
Vivo एक्स नोट आणि Vivo Pad ची किंमत
X Note हा फोन 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. याच्या बेस मॉडेलची किंमत CNY 5999 (जवळपास 71,400 रुपये) इतकी आहे, तर 12GB RAM पर्यायाची किंमत CNY 6,499 (जवळपास 77,400 रुपये) आणि टॉप व्हेरिएंटची किंमत CNY 6999 (जवळपास 83,300 रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे. हा फोन निळा, काळा आणि राखाडी या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये तो येतो. Vivo ने Vivo Pad 8GB + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. त्यांची किंमत CNY 2499 (जवळपास 29,800 रुपये) आणि CNY 2999 (जवळपास 35,700 रुपये) आहे. हा टॅबलेट निळ्या आणि राखाडी रंगात येतो.
Vivo X Fold चे स्पेसिफिकेशन्स
नवीन Vivo फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 8.03 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 4:3.5 आस्पेक्ट रेश्यो आणि 2K रिझोल्यूशन आहे. स्क्रीनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरासाठी होल-पंच कटआउट आहे. यासह, डिव्हाइसला एरोस्पेस-ग्रेड विंग हिंग मिळते. बाहेरील बाजूस 6.53 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 21:9 इतका आहे आणि तो उजव्या बाजूला किंचित कर्व्ड आहे.
या फोल्डेबल फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC प्रोसेसर आहे. यात 66W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4600mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाइसच्या मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. जो 50MP F/1.75 मुख्य कॅमेरा सेन्सर आणि 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरासह येतो. कॅमेरा सेटअपमध्ये 12MP पोर्ट्रेट कॅमेरा (47mm फोकल लेंथ) आणि 5X पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 60x डिजिटल झूमसह 8MP पेरिस्कोप कॅमेरा समाविष्ट आहे. हे डिव्हाइस अलर्ट स्लाइडरसह देखील येते.
इतर बातम्या
‘व्हॉट्सअॅप’चं नवीन फीचर खूपच भारी! इमेज पाठवताना आता युजर्स अनुभवणार नवा बदल
5000 mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह Motorola चा नवीन फोन भारतात लाँच, किंमत 9999 रुपयांपासून…
Budget Gaming Phone: 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये टॉप 4 स्मार्टफोन्स, यादीत Redmi ते Moto चे पर्याय