Vivo X200 सीरिजची ‘या’ दिवशी धमाकेदार एन्ट्री; फिचर्स पाहून आश्चर्य वाटेल

नवा स्मार्टफोन घ्यायचा आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. विवो कंपनीने आपली नवीन Vivo X200 स्मार्टफोन सीरिज जागतिक स्तरावर लॉन्च करणार आहे. ही सीरिज 19 नोव्हेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ही लॉन्च करण्यात येणार आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

Vivo X200 सीरिजची 'या' दिवशी धमाकेदार एन्ट्री; फिचर्स पाहून आश्चर्य वाटेल
Vivo X200Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 11:36 AM

स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय का? मग कन्फ्यूज होऊ नका. आम्ही आज तुमच्यासाठी एका नव्या स्मार्टफोनची माहिती घेऊन आलो आहोत. विवो आपली नवीन Vivo X200 स्मार्टफोन सीरिज जागतिक स्तरावर लॉन्च करणार आहे. याविषयी सखोल माहिती जाणून घ्या.

ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेली Vivo X200 ही सीरिज आता 19 नोव्हेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सादर केली जाणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनचा टीझरही जारी केला आहे. चीनमध्ये या सीरिजमध्ये तीन मॉडेल्स सादर करण्यात आले असले तरी ते केवळ विवो एक्स 200 आणि विवो एक्स 200 प्रो मॉडेलसह जागतिक बाजारात सादर केले जाण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोन्सची प्री-ऑर्डर कधी सुरू होणार?

विवो मलेशियाने पुष्टी केली आहे की, Vivo X200 सीरिजचे ग्लोबल लाँचिंग 19 नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होईल. लाँचिंगनंतर तीन दिवसांनी म्हणजेच 22 नोव्हेंबरला या स्मार्टफोन्सची प्री-ऑर्डर सुरू होईल.

Vivo X200 आणि एक्स 200 प्रो मध्ये 32 GB पर्यंत रॅम (16 GB फिजिकल आणि 16 GB व्हर्च्युअल) आणि 512 GB पर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत Vivo X200 अरोरा ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल, तर Vivo X200 प्रो मिडनाईट ब्लॅक आणि टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध असेल.

बॅटरी आणि चार्जिंग

Vivo X200 मध्ये 90 वॉट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह 5,800 एमएएच बॅटरी पॅक केली जाईल. तर Vivo X200 प्रो मध्ये अधिक क्षमतेची 6000 एमएएचची बॅटरी देण्यात येणार आहे. ही जास्त बॅकअपची हमी देते.

भारतात कधी लॉन्च होणार?

विवोने भारतात लाँचिंगची तारीख जाहीर केली नसली तरी ग्लोबल लाँचिंग आणि टीझरवरून हे स्पष्ट झाले आहे की लवकरच तो भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. Vivo X200 सीरिज त्याच्या दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाईनमुळे युजर्समध्ये खूप लोकप्रिय होऊ शकते.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Vivo X200 प्रोमध्ये 6.78 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. दुसरीकडे, Vivo X200 मध्ये थोडा लहान, 6.67 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये लेटेस्ट मीडियाटेक डायमेंसिटी 9400 चिपसेट चा वापर केला जाईल. यामुळे फोनची परफॉर्मन्स सुधारण्याची अपेक्षा आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये 32 GB पर्यंत रॅम असेल.

कॅमेरा सेटअप

Vivo X200 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 50 एमपी टेलिफोटो लेन्सचा समावेश असेल. त्याचबरोबर Vivo X200 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील मिळेल, परंतु 200 एमपी झेस एपीओ टेलिफोटो लेन्स जोडण्यात आला आहे, ज्यामुळे तो आणखी खास बनला आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड लेन्स असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.