5000mAh बॅटरी, 13MP डुअल कॅमेरासह Vivo चे दोन बजेट स्मार्टफोन बाजारात

Vivo ने त्यांचा Y15A स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात Helio P35 प्रोसेसर, वॉटरड्रॉप नॉच आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

5000mAh बॅटरी, 13MP डुअल कॅमेरासह Vivo चे दोन बजेट स्मार्टफोन बाजारात
Vivo Y15A
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 11:58 AM

मुंबई : Vivo ने त्यांचा Y15A स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात Helio P35 प्रोसेसर, वॉटरड्रॉप नॉच आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सध्या कंपनीने हा मोबाईल फोन फिलिपिन्समध्ये लॉन्च केला आहे. Vivo Y15S (2021) मध्ये देखील असेच फीचर्स देण्यात आले आहेत. (Vivo Y15A and Vivo Y15s launched; check its price, specs and feature)

Vivo Y15A चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Vivo Y15A मध्ये 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह (720 x 1600 pixels) येतो. तसेच त्याचा अॅस्पेक्ट रेशो 20:9 आहे. या Vivo मोबाईलचे वजन 178 ग्रॅम आहे. तसेच यामध्ये सेल्फी नॉच देण्यात आला आहे.

Vivo Y15A चा कॅमेरा सेटअप

Vivo Y15A च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच LED फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन Funtouch OS 11.1 आधारित Android 11 वर काम करतो.

Vivo Y15A प्रोसेसर आणि बॅटरी

Vivo च्या या मोबाईल मध्ये MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच हा 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात 4G Dual WiFi, Bluetooth 5.0, GPS, MicroSD कार्ड, MicroUSB स्लॉट आहेत. साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळेल.

Vivo Y15s (2021) चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Vivo Y15s (2021) चे डिझाइन आणि काही फीचर्स Vivo Y15A प्रमाणेच आहेत. यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरंनल स्टोरेज आहे. तसेच, हा फोन Android Go एडिशनवर काम करतो, जो Google ने खास कमी बजेट फोनसाठी डिझाइन केला आहे.

Vivo Y15A आणि Vivo Y15s (2021) ची किंमत

Vivo Y15A फिलिपिन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि Vivo Y15s (2021) इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Vivo Y15s (2021) ची किंमत PHP 7,999 (जवळपास 11,895 रुपये) आहे. तर Vivo Y15s (2021) ची किंमत IDR 18,99,000 (जवळपास 9,962 रुपये) आहे. हा स्मार्टफोन वॉटरग्रीन आणि मिस्टिक ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Vivo Y15A and Vivo Y15s launched; check its price, specs and feature)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.