Vivo Y16 : विवोचा आणखी एक बजेट स्मार्टफोन… दमदार बॅटरीसह 3 कॅमेरा सेटअप
विवो गेल्या काही महिन्यांपासून एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन बाजारात आणत आहे. कंपनीने ग्राहकांसाठी आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo Y16 आणला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. त्यामध्ये ग्राहकांना एंट्री-लेव्हल फीचर्स पाहायला मिळतील. या हँडसेटच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सर्व माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.
विवो इंडियाकडून विवो वाय 16 (Vivo Y16) हा नवीन बजेट स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत. हा बजेट स्मार्टफोन असूनही यात फीचर्सची कुठलीही कमतरता भासणार नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनच्या महत्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे, तर हा विवो (Vivo) मोबाईल फोन 5000 mAh मजबूत बॅटरी, मीडिया टेक (MediaTek) प्रोसेसर आणि मोठा डिस्प्ले यांसारख्या फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. त्यामध्ये एंट्री-लेव्हल स्पेसिफिकेशन्स दिले गेले आहेत, Vivo फोनमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल Vivo Y16 च्या किंमतीबद्दल माहिती बघणार आहोत.
डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर
Vivo स्मार्टफोन 6.51 इंचाचा IPS LCD डिस्प्लेसह उपलब्ध होणार आहे. हा डिस्प्ले HD+ (1600×720 pixels) रिझोल्यूशन ऑफर करतो. त्यासोबतच हा अपकमिंग Vivo फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.
प्रोसेसर, रॅम
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Vivo Y26 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसरसह 4 जीबी रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हा हँडसेट 1 GB व्हर्चुअल रॅम सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप
फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, 13 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा सेंसरसह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसर उपलब्ध असेल. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटी
Vivo Y16 ला ड्युअल-बँड Wi-Fi, GLONASS, 4G LTE आणि ब्लूटूथ व्हेरिएंट 5 सपोर्ट मिळेल. सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
बॅटरी
फोनमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे यात तब्बल 10 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन अधिक दमदार होता.
काय असणार किंमत?
कंपनीने अद्याप या हँडसेटच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही. पण कंपनीच्या वेबसाईटवरून हा हँडसेट स्टेलर ब्लॅक आणि ड्रिझलिंग गोल्ड कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.