15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये Vivo Y21 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या डिव्हाईसमध्ये काय असेल खास?

बल स्मार्टफोन ब्रँड Vivo ने शुक्रवारी एक नवीन 5G स्मार्टफोन Y21 (Vivo Y21) लाँच केला आहे. जो आता ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवर 15,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये Vivo Y21 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या डिव्हाईसमध्ये काय असेल खास?
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 11:44 PM

मुंबई : ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड Vivo ने शुक्रवारी एक नवीन 5G स्मार्टफोन Y21 (Vivo Y21) लाँच केला आहे. जो आता ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवर 15,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोन 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजसह येतो (इंटर्नल स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येईल). यामध्ये एक्सटेंडेड रॅम 2.0 देखील ऑफर करण्यात आला आहे, जो 1GB इनॅक्टिव्ह रॉम आहे. दरम्यान, कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, या फोनचं 4 जीबी + 64 जीबी व्हेरिएंट लवकरच उपलब्ध होईल. (Vivo Y21 launched in India, check price and features)

विवो इंडियाच्या ब्रँड स्ट्रॅटेजीचे संचालक निपुण मार्या यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “ट्रेंडी डिझाईन आणि लेटेस्ट फीचर्ससह, Y21 आमच्या Y सिरीजचा पोर्टफोलिओ पुढे नेईल. Y21 लाँच केल्यावर, हा 5000 mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ स्मार्टफोन बनला आहे. हे डिव्हाईस भारतातील आमच्या जेन-जेड ग्राहकांसाठी डिझाइन केले गेले आहे, ज्यांना एक ऑल-राउंडर स्मार्टफोन हवा आहे, हा फोन त्यांच्या वेगवान लाइफस्टाइलच्या गरजा पूर्ण करेल.”

स्मार्टफोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट

स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचांचा एचडी प्लस हेलो फुल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, जो इमर्सिव व्ह्यूइंग एक्सपीरियन्ससाठी इन-सेल टेक्नोलॉजीसह येतो. 18W फास्ट चार्ज क्षमतेसह हा स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी प्रदान करतो.

युजर्सना शानदार फोटोग्राफी एक्सपिरियन्स मिळेल

डिव्हाइसमध्ये 13 एमपी प्रायमरी सेन्सर आणि 2 एमपी सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. हा पर्सनलाइज्ड पोर्ट्रेट मोड, सुपर एचडीआर, फेस ब्यूटी, फिल्टर्स आणि बोकेहसह अनेक फीचर्ससह सुसज्ज आहे, जे इमर्सिव फोटोग्राफीचा अनुभव देतात. डिव्हाइसमध्ये सेल्फीसाठी AI ब्यूटीफिकेशन मोडसह 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

जबरदस्त परफॉर्मन्स

Y21 हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसर, 128 GB ROM ची मेमरी क्षमता आणि Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 सह सादर करण्यात आला आहे. मल्टी टर्बो 5.0 ने दीर्घकाळ वापर केल्यानंतरही डेटा कनेक्शन, सिस्टम प्रोसेसर स्पीड आणि पॉवर सेव्हिंग परफॉर्मन्सला एका नवीन स्तरावर नेले आहे.

नवीन Vivo Y21 दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात मिडनाइट ब्लू आणि डायमंड ग्लो चा समावेश आहे. हा स्मार्टफोन विवो इंडिया ई-स्टोअर, Amazon, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटाक्लिक, बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअर आणि सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Vivo Y21 launched in India, check price and features)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.