AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत

व्हिवो (Vivo) कंपनीने भारतात त्यांचा दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचं नाव Y51 असं आहे.

48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 11:11 PM

मुंबई : व्हिवो (Vivo) कंपनीने भारतात त्यांचा दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचं नाव Y51 असं आहे. कंपनीने हा स्मार्टफोन केवळ भारतीय युजर्सना डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे. या फोनमध्ये 1080p डिस्प्ले, ट्रिपल कॅमरा आणि प्रीमियम डिजाईन देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारात रियलमी 6i, रेडमी नोट 9 आणि ओप्पो A52 या स्मार्टफोन्सशी थेट टक्कर होणार आहे. (Vivo Y51 launched with 1080p screen 48MP triple cameras and 5000mA Battery)

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, Vivo कंपनी भारतात त्यांच्या Y सीरिज अंतर्गत जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. त्याची आता सुरुवात झाली आहे, असं म्हणता येईल. कारण नुकताच कंपनीने Y51 हा दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा फोन कंपनीने ग्रेटर नोएडा फॅसिलिटी सेंटर येथे बनवला आहे.

Y51 या स्मार्टफोनमध्ये 48MP AI पॉवर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे. ज्यामध्ये इनबिल्ट मल्टीपल शुटिंग मोड्स आहेत. ज्याद्वारे तुम्ही दिवसा आणि रात्री अल्ट्रा-क्लियर शॉट्स घेऊ शकता. स्मार्टफोनमध्ये 16.71 सेमी (6.58) हॅलो फुलव्ह्यू डिस्प्लेसह एफएचडी + (2408 ×1080) रेजॉल्यूशन देण्यात आलं आहे. जे एक विस्तृत आणि इमर्सिव मीडिया कंसम्पशन एक्सपीरियन्स देईल.

फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सलचा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर देण्यात आला आहे. तर फ्रंटला (सेल्फी कॅमेरा) 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिवोच्या या स्मार्टफोनची किंमत 17,990 रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला 8GB रॅम + 128GB स्टोरेज स्पेस मिळेल. तसेच हा स्मार्टफोन टायटेनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिम्फनी या दोन संगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये 5000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर

Realme ही चिनी स्मार्टफोन कंपनी गेल्या वर्षभरापासून देशातील अनेक मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. कंपनीने आता भारतात X7 सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. X7 सिरीज कधी लाँच होणार याबाबतची कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केली नसली तरी हा फोन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन असणार आहेत. X7 आणि X7 प्रो अशी या स्मार्टफोनची नावं असतील.

रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल्सचा सोनीचा IMX686 प्रायमरी सेन्सर दिला जाणार आहे. तसेच 8 मेगापिक्सेलचा अजून एक सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) दिला जाईल. तसेच फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

8MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

(Vivo Y51 launched with 1080p screen 48MP triple cameras and 5000mA Battery)

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.