8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

विवो ही स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी येत्या 4 डिसेंबरला एक नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Vivo Y55s असे आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याचे अनेक स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा संदर्भातील महत्त्वाची बातमी लीक झाली आहे.

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Vivo Y55s
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 6:00 AM

मुंबई : विवो ही स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी येत्या 4 डिसेंबरला एक नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Vivo Y55s असे आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याचे अनेक स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा संदर्भातील महत्त्वाची बातमी लीक झाली आहे. (Vivo Y55s ready to launch, image and specifications leaked befor its debut)

Gizmochina या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Vivo Y55s या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच LCD स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये टियरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबत या फोनमध्ये संपूर्ण एचडी प्लस रेजोल्यूशन सपोर्ट स्क्रीन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मीडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 6000mAh इतकी आहे. 3C च्या मते हा फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.

विवोच्या या फोनमध्ये ग्राहकांना ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच हा फोन अँड्रॉईड 11 ऑपरेटींग सिस्टम (ओएस) वर काम करतो. यात Wi-Fi, ब्लूटूथ, यूएसबी-सी पोर्ट आणि एक 3.5mm ऑडियो जॅकही देण्यात आला आहे. तसेच यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला फार सहज मोबाईल अनलॉक करता येऊ शकतो.

50 मेगापिक्सलचा कॅमेरा

या फोनच्या बॅक पॅनलमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा आहे. तर सेकेंडरी कॅमेरा हा 2 मेगापिक्सलचा आहे. तसेच यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत

विवोच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत 297 डॉलर म्हणजेच जवळपास 22 हजार 290 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा फोन सिरॅमिक ब्लॅक, मिरर लेक ब्लू आणि चेरी पिंक मिटिओर या रंगात उपलब्ध होणार आहे. या फोन चीनमध्ये 4 डिसेंबरला लाँच होणार आहे. दरम्यान, हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

इतर बातम्या

Twitter, Google, Microsoft ते Adobe… टॉप टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, सिलिकॉन व्हॅलीतला दबदबा वाढतोय

50MP कॅमेरा, 8 GB रॅमसह Redmi Note 11T 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत

(Vivo Y55s ready to launch, image and specifications leaked befor its debut)

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....