Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smartphone : आयफोन 12 पेक्षाही महाग विवोचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

भारतात विवो एक्स 80 ची किंमत 54 हजार 999 असून हा स्मार्टफोन 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम मॉडेलसह उपलब्ध आहे.

Smartphone : आयफोन 12 पेक्षाही महाग विवोचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
फ्लॅगशिप स्मार्टफोनImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:11 PM

मुंबई : विवोने नुकतेच आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन (flagship smartphone) विवो एक्स 80 (Vivo X80) लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी तयार आहे. नवीन विवो एक्स सिरीज फोन नुकतेच देशात तब्बल 54 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतींसह लाँच केले होते. या फोनला घेउ इच्छूक ग्राहक या फोनला एक्सचेंज आणि बँक ऑफर्ससोबत बर्याच कमी किमतीत खरेदी करु शकणार आहेत. हँडसेटमध्ये हुडच्या खाली एक प्रमुख मीडियाटेक चिपसेट (MediaTek chipset) देण्यात आलेला आहे. तसेच कॅमेरात एक चांगला सेटपॅक देण्यात आला आहे. भारतात विवो एक्स 80 ची किंमत 54 हजार 999 असून हा स्मार्टफोन 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम मॉडेलसह उपलब्ध आहे. जर तुम्ही काही अटी पूर्ण केल्यास हा फोन तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 5 हजार रुपये इंस्टेंट डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. यामुळे या स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत येउ शकते. फ्लिपकार्टवर तुम्ही जुन्या फोनला एक्सचेंज करुन या स्मार्टफोनवर 32 हजार रुपयांपर्यंतची सुट मिळवून निवडक मॉडेलवर अतिरिक्त दोन हजार रुपयांचे डिस्काउंट मिळवू शकणार आहात. डिस्काउंट ऑफर ही तुमच्या सध्याच्या मोबाईलच्या स्टेटसच्या आधारावर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

विवो एक्स 80 चे स्पेसिफिकेशन्स

विवो एक्स 80 या स्मार्टफोनला नुकतेच भारतात फ्लॅगशिप मीडियाटेक 9000 प्रोसेसरसोबत घोषित करण्यात आले होते. डिव्हाईसमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट होतो. सोबत 6.78 इंचाची एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्यात 50 मेगापिक्सलचे प्रायमरी सेंसर, 12 मेगापिक्सलचा केमेरा आणि 12  मेगापिक्सलचे सेंसर समाविष्ट आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

काय आहे बँक ऑफर्स?

जर तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरसह जवळपास 45 हजार रुपयांमध्ये विवो एक्स 80 खरेदी करत असाल तर ही एक चांगली डील आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून ग्राहकांना एक चांगला कॅमेरा एक्सपिरियंस मिळणार आहे. यात क्वालकोमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 एसओसी नसले तरी मीडियाटेकची फ्लॅगशिप 9000 चिप खूप पॉवरफल आहे. या माध्यमातून एक चांगल गेमिंग एक्सपिरीयंस युजर्सना मिळणार आहे. अनेक ब्रँडमध्ये 80W फास्ट चार्जरला बंडल करणे सुरु करण्यात आले आहे. आणि नवीन विवो एक्स 80 देखील यासह उपलब्ध आहे. या माध्यमातून काहीच मिनिटांमध्ये बॅटरी जलद पध्दतीने चार्ज करण्यास मदत होत असते.

कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन.
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.